शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अबब! काटवलांचा भाव तब्बल २८० रुपये किलाे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 05:00 IST

काटवलाची भाजी चविला थोडी कडवट असली तरी चविष्ट आहे. चविला हटके आणि आराेग्यदायी असलेल्या काटवल व कारल्याला नागरिकांकडून माेठी पसंती आहे. गडचिराेलीच्या बाजारात तालुक्यातील येवली, शिवणी, अमिर्झा भागातून शेतकरी काटवले घेऊन येतात. इंदिरा गांधी चाैकातही अनेक जण बसतात.

ठळक मुद्देआतापर्यंतचे सर्वाधिक दर मशरूमलाही टाकले मागे

दिलीप दहेलकरलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : पावसाळ्याच्या दिवसात शहरासह अनेक ठिकाणच्या बाजारात रानभाज्या येतात. याच काळात शेतशिवारात आणि कुपकाटीत काटवल अर्थात करटाेली ही वेलवर्गीय फळभाजी आढळून येते. या भाजीला गडचिराेली शहरात सध्या चांगलीच मागणी आहे. त्यामुळे काटवलांनी भावाचा विक्रमी पल्ला गाठला आहे. काटवल ७० रुपये पाव, म्हणजे २८० रुपये किलाे अशा दराने विकले जात आहे.

पावसाळ्यात सर्वाधिक महाग मिळणारी भाजी म्हणजे मशरूम, अर्थात आळंबी. पण सध्या काटवलांनी एवढा भाव खाल्ला आहे की मशरूमही त्यांच्यासमोर स्वस्त वाटत आहे.काटवलाची भाजी चविला थोडी कडवट असली तरी चविष्ट आहे. चविला हटके आणि आराेग्यदायी असलेल्या काटवल व कारल्याला नागरिकांकडून माेठी पसंती आहे. गडचिराेलीच्या बाजारात तालुक्यातील येवली, शिवणी, अमिर्झा भागातून शेतकरी काटवले घेऊन येतात. इंदिरा गांधी चाैकातही अनेक जण बसतात.

पोषक गुणधर्मकाटवलामध्ये प्राेटीन, आयर्न मुबलक असतात. याशिवाय फायबर व ॲन्टीॲाक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे ही भाजी पचायला हलकी असते. पावसाळ्याच्या दिवसात इन्फेक्शनचा धाेका, बद्धकाेष्टता व पाेटाजवळील चरबी कमी करण्यासाठी काटवलाच्या भाजीचे सेवन करणे अतिशय फायदेशीर ठरते. यात शरीरामधील नको असलेले घातक घटक बाहेर टाकण्यासाठी मदत हाेते.

 

टॅग्स :vegetableभाज्या