उच्च माध्यमिकच्या ९३५ शिक्षकांचे वेतन थकले

By Admin | Updated: June 19, 2015 01:39 IST2015-06-19T01:39:42+5:302015-06-19T01:39:42+5:30

कनिष्ठ महाविद्यालयात पायाभूत पदावर कार्यरत असलेल्या ९३५ शिक्षकांचे वेतन आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

935 teachers of high school tired | उच्च माध्यमिकच्या ९३५ शिक्षकांचे वेतन थकले

उच्च माध्यमिकच्या ९३५ शिक्षकांचे वेतन थकले

आंदोलनाचा इशारा : आधारकार्डची मागणी
गडचिरोली : कनिष्ठ महाविद्यालयात पायाभूत पदावर कार्यरत असलेल्या ९३५ शिक्षकांचे वेतन आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या शिक्षकांच्या वेतनाची तरतूद करण्यात यावी, यासाठी शिक्षक भारती संघटनेने सातत्याने पाठपुरावा सुरू केला होता. या पदांवर तीन ते सात वर्षापेक्षा अधिक काळ होऊनही शिक्षक विनावेतन काम करीत होते. शिक्षक भारती संघटनेच्या मागणीनंतर त्यांच्या वेतनाची तरतूद करण्यात आली होती. मात्र ८ जून २०१५ रोजी शिक्षण विभागाच्या पत्रानुसार या शिक्षकांना आणखी वाट बघावी लागणार आहे. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची संख्या व आधारकार्ड क्रमांकाची मागणी केली आहे. हे सर्व गोळा करून सादर करण्यासाठी सहा महिने ते एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे वेतन लांबणार आहे. पटसंख्या व अन्य माहिती गोळा झाल्यानंतरच या पदांना मंजुरी मिळाली होती. आता आधारकार्डच्या नावाखाली जाणीवपूर्व विनावेतन ठेवले जात आहे. शिक्षकांच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट कोसळले आहे. वेतन त्वरित देण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष एम. एन. चलाख यांनी दिला आहे.

Web Title: 935 teachers of high school tired