शहरं
Join us  
Trending Stories
1
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
2
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
3
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
4
Twisha Sharma : MBA, योगा ट्रेनर, मॉडेल-अ‍ॅक्टर होती ट्विशा शर्मा; ज्या तारखेला लग्न झालं, त्याच दिवशी जग सोडलं
5
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
6
Sex Racket: नोकरीचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकललं; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ जणींची सुटका!
7
पुतिन यांच्या चीन दौऱ्याचा मोठा गेमप्लॅन; जिनपिंग यांच्याकडून 'या' महाप्रकल्पाला मंजुरी मिळवणार!
8
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
9
भारती सिंह घटस्फोट घेणार? हर्ष लिंबाचियासोबत बिनसल्याच्या चर्चांवर म्हणाली, "आम्ही दोघं..."
10
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
11
हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू
12
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
13
Vastu Tips: बेडरूममध्ये नकारात्मकता जाणवतेय? 'हे' तीन वास्तू उपाय मिळवून देतील मन:शांती 
14
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
15
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
16
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
17
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
18
गाडीला अचानक हादरा देणारे Rumble Strips कशासाठी असतात, तुम्हाला माहितीये का?
19
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
20
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
Daily Top 2Weekly Top 5

मोहसडव्याची ९० मडकी नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:01 IST

मौशीचक येथे जवळपास ४० व्यक्ती गावठी दारू गाळून त्याची विक्री करतात. आसपासच्या अनेक गावांना या दारूविक्रीचा त्रास सहन करावा लागतो. पाल नदीच्या आश्रयाने अनेक जण मोठ्या प्रमाणात मोहाचा सडवा टाकल्याची माहिती मुक्तिपथ उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांना मिळाली. त्यांनी गडचिरोली पोलिसांना याची माहिती दिली.

ठळक मुद्देपोलीस व मुक्तिपथची कारवाई : मौशीचकच्या पाल नदीलगत दारू अड्डे केले उद्ध्वस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तालुक्यातील मौशीचक गावाला लागून वाहणाऱ्या पाल नदीलगत टाकलेला तब्बल ९० मडकी मोहसडवा पोलीस व मुक्तिपथ चमूने नष्ट केला. शनिवारी ही कारवाई करण्यात आली. सडव्या सोबतच दारू गाळण्याचे साहित्यही पोलिसांनी नष्ट केले.
मौशीचक येथे जवळपास ४० व्यक्ती गावठी दारू गाळून त्याची विक्री करतात. आसपासच्या अनेक गावांना या दारूविक्रीचा त्रास सहन करावा लागतो. पाल नदीच्या आश्रयाने अनेक जण मोठ्या प्रमाणात मोहाचा सडवा टाकल्याची माहिती मुक्तिपथ उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांना मिळाली. त्यांनी गडचिरोली पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी त्यांच्यासोबत गावाजवळील नाल्याचा परिसर पिंजून काढला. यावेळी तब्बल १० ठिकाणी जमिनीखाली ९० मडक्यात गाडलेल्या स्थितीत मोहसडवा आढळून आला. हा सर्व सडवा मडक्यांसहित पोलीस व मुक्तिपथ चमूने नष्ट केला. सोबतच दारू गाळण्यासाठी वापरात येणारी लपवून ठेवलेली भांडीही यावेळी सापडली. ती देखील पोलिसांनी नष्ट केली. तब्बल दीड लाखाचा मुद्देमाल यावेळी नष्ट करण्यात आला.
पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार भास्कर ठाकरे, प्रमोद वाळके आणि दिनकर मेश्राम यांनी ही कारवाई केली. कारवाईसाठी भिकारमौशी येथील माजी पोलीस पाटील दिवाकर निलेकार यांनीही सहकार्य केले. परिसराच्या बोथेडा व मरेगावातही मोठ्या प्रमाणात मोहफुलाची दारू गाळली जात आहे.

सावरगावात घरांची झडती
राज्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या धानोरा तालुक्यातील सावरगाव येथे शनिवारी येथील पोलीस निरीक्षक कुमार ढेरे यांच्या मार्गदशनात पोलीस कर्मचाऱ्यांनी दारू विक्रेत्यांच्या घराची झडती घेतली. यावेळी एका घरी सापडलेला सडवा पोलिसांनी नष्ट केला. सर्रास दारू विक्री होत असल्याने इतर विक्रेत्यांना दारू विक्री पूर्णत: थांबविण्याची तंबी दिली. यावेळी मुक्तिपथ तालुका प्रेरक अक्षय पेद्दीवार व नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक