६० महिलांनी घेतले चारा व्यवस्थापनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:39 IST2021-02-09T04:39:27+5:302021-02-09T04:39:27+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : महिला आर्थिक विकास महामंडळ, आत्मा, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व ज्ञानदीप लाेकसंचालित साधन ...

60 women took fodder management lessons | ६० महिलांनी घेतले चारा व्यवस्थापनाचे धडे

६० महिलांनी घेतले चारा व्यवस्थापनाचे धडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

आरमोरी : महिला आर्थिक विकास महामंडळ, आत्मा, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व ज्ञानदीप लाेकसंचालित साधन केंद्र आरमाेरीच्या संयुक्त विद्यमाने येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवनात दुधाळ जनावरांसाठी चारा व्यवस्थापन व चारा पीक लागवडीबाबत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. जवळपास ६० महिलांनी चारा व्यवस्थापनाचे धडे घेतले.

या वेळी शेतीच्या बांधावर किंवा घरी परसबागेत लावायच्या वृक्षांची रोपे बचत गटाच्या महिलांना देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा दुग्धविकास व्यवसाय अधिकारी सचिन यादव हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे वैज्ञानिक विक्रम कदम, माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी मोहन घनोटे, आत्माचे बीटीएम रहांगडाले, तालुका पशुधन विस्तार अधिकारी वैभव देशपांडे, साधन केंद्राच्या व्यवस्थापक यामिनी मातेरे आदी उपस्थित होते.

चारा पीक लागवड करण्याकरिता बचत गटातील शेतकरी महिलांना व दुग्ध व्यवसाय करणाऱ्या महिलांना तथा दूध वितरित करणाऱ्या महिलांना शेतीच्या बांधावर लावण्यासाठी तथा घरी परसबागेत रिकाम्या जागेत लागवड करण्यासाठी दाेन हजार राेपे वितरित करण्यात आली. सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक अल्का मेश्राम, संचालन सरिता सहारे तर आभार भास्कर खरकाटे यांनी मानले. यशस्वीतेसाठी ज्योती खोब्रागडे, वर्षा रामटेके, कुंदा मेश्राम, निराशा लोणार, मंदा बुटे आदींनी सहकार्य केले.

Web Title: 60 women took fodder management lessons