शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
4
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
5
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
6
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
7
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
8
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
9
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
10
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
12
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
13
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
14
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
15
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
16
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
17
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
18
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
19
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
20
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
Daily Top 2Weekly Top 5

जिमलगट्टावासीयांची राष्ट्रीय बँकेसाठी ६० किलोमीटरची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:50 IST

जिमलगट्टा परिसरात ६०च्या जवळपास गावे आहेत. जिमलगट्टापासून काही गावे पुन्हा ४० किमी अंतरावर आहेत. या गावातील नागरिकांना अहेरी येथे ...

जिमलगट्टा परिसरात ६०च्या जवळपास गावे आहेत. जिमलगट्टापासून काही गावे पुन्हा ४० किमी अंतरावर आहेत. या गावातील नागरिकांना अहेरी येथे येण्यासाठी सुमारे १०० किमीचे अंतर पार करावे लागते. जिमलगट्टा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एक शाखा आहे. या शाखेत ४० किमी व्यासाच्या परिसरातील नागरिकांची शेकडाे बँक खाती आहेत. त्यामुळे या बँकेत सकाळपासूनच नागरिकांची गर्दी राहाते. त्यामुळे सकाळी आल्यानंतर दुपारी उशिरापर्यंत त्यांचे बँकेचे व्यवहार पूर्ण हाेतात. सायंकाळी गावाला जाणे शक्य हाेत नाही. त्यामुळे जिमलगट्टा येथेच मुक्काम करावा लागतो. परिसराचा व्याप व खातेदारांची संख्या लक्षात घेता या ठिकाणी पुन्हा एक मध्यवर्ती बँक असणे आवश्यक आहे.

काही कामे राष्ट्रीयीकृत बँकेतूनच पूर्ण हाेतात. मात्र, जिमलगट्टा व परिसरातील एकाही गावामध्ये राष्ट्रीयीकृत बँक नाही. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकेतून एखादे काम करायचे असल्यास नागरिकांना अहेरी येथे गेल्याशिवाय पर्याय राहात नाही. ६० ते १०० किमीचे अंतर गाठून बँकेचे काम करणे व गावाला त्याच दिवशी परत येणे शक्य हाेत नाही. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकेशी संबंधीत असलेले कामे रखडतात. या परिसरात राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा असावी, यासाठी स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. मात्र, अजूनपर्यंत राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा येथे स्थापन करण्यात आली नाही.