५० रूग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 05:00 AM2020-08-09T05:00:00+5:302020-08-09T05:00:53+5:30

कोरोनामुक्त झालेल्या ५० रूग्णांमध्ये जिल्हा पोलीस दलातील ३६ जवान, पाच जिल्हा सामान्य रूग्णालयातील कर्मचारी, आंबेडकरनगर देसाईगंज येथील पाच जण, आरमोरी येथील दोन व मुलचेरा येथील एका रूग्णाचा समावेश आहे. १८ बाधितांमध्ये अहेरी तालुक्यातील १७, मुलचेरा येथील १ अशा १८ जणांचा समावेश आहे. अहेरी तालुक्यातील एक सुरक्षा जवान मागील आठवड्यात कोरोनाबाधित आढळून आला.

50 patients coronary free | ५० रूग्ण कोरोनामुक्त

५० रूग्ण कोरोनामुक्त

Next
ठळक मुद्दे१८ नागरिक बाधित । कोरोना रॅपिड टेस्ट करण्याचे प्रमाण वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागील २४ तासात गडचिरोली जिल्ह्यातील ५० कोरोना रूग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १८ नागरिक पुन्हा पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
कोरोनामुक्त झालेल्या ५० रूग्णांमध्ये जिल्हा पोलीस दलातील ३६ जवान, पाच जिल्हा सामान्य रूग्णालयातील कर्मचारी, आंबेडकरनगर देसाईगंज येथील पाच जण, आरमोरी येथील दोन व मुलचेरा येथील एका रूग्णाचा समावेश आहे. १८ बाधितांमध्ये अहेरी तालुक्यातील १७, मुलचेरा येथील १ अशा १८ जणांचा समावेश आहे. अहेरी तालुक्यातील एक सुरक्षा जवान मागील आठवड्यात कोरोनाबाधित आढळून आला. त्याच्या संपर्कातील १७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मुलचेरा संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या एका जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७१२ झाली आहे. सक्रीय कोरोना रूग्ण १९१ झाले आहेत. तर ५६० रूग्ण कोरोनापासून मुक्त झाले आहेत. त्यांना सुटी देण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांपासून कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. मात्र ज्यांना कोरोनाची लागण होत आहे, ते कोरोनावर मात करून कोरोपासून मुक्त सुध्दा होत आहेत. ही अतिशय जमेची बाजू आहे. आरोग्य विभागाने ठिकठिकाणी शिबिरे घेऊन नागरिकांची रॅपिड कोरोना चाचणी करणे सुरू केले आहे. त्यामुळे कोरोना रोगाचे निदान वेळीच होत आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीपासून कोरोनाचा होणारा प्रसार थांबण्यास फार मोठी मदत होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूदर अतिशय कमी आहे. त्यामुळे कोरोनाविषयची नागरिकांमध्ये असलेली अनावश्यक भिती दूर होण्यास मदत झाली आहे.

४८५ जवानांना कोरोनाची बाधा, ४०९ झाले बरे
गडचिरोली जिल्ह्यात सीआरपीएफ, एसआरपीएफ व पोलीस जवान तैनात आहेत. या जवानांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण अधिक आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत ४८५ सुरक्षा जवानांना कोरोनाची लागण झाली. त्यामध्ये एसआरपीएफच्या ३०८ जवानांना बाधा झाली. त्यापैकी २८२ बरे झाले. २६ जवानांवर उपचार सुरू आहेत. सीआरपीएफच्या एकूण ११२ जवानांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी ८८ बरे झाले व २४ जवानांवर उपचार सुरू आहेत. ६५ पोलीस जवान कोरोनाबाधित झाले. त्यापैकी ३९ बरे झाले व २६ जणांवर उपचार सुरू आहेत. गडचिरोली जिल्ह्यात सीआरपीएफ, एसआरपीएफच्या तुकड्या तैनात आहेत. या तुकड्या गडचिरोली जिल्ह्यात आल्यानंतर येथील जवानांना सर्वप्रथम १४ दिवस क्वारंटाईन ठेवले जाते. त्यामुळे इतरांकडे प्रसार होत नाही.

मेडिगड्डावरील नियम कडक
सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवरील मेडिगड्डा बॅरेजच्या पुलावरून तेलंगणा ते सिरोंचा तालुक्यात खुलेआम प्रवास सुरू होता. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर या ठिकाणी ये-जा करण्याचे नियम कडक करण्यात आले आहेत.

Web Title: 50 patients coronary free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.