शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

पात्र ठरूनही ४६ शाळांना अनुदान नाही

By admin | Updated: July 12, 2015 02:03 IST

३० जून २०१४ च्या शासन निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २२ विनाअनुदानित माध्यमिक तर दुसऱ्या टप्प्यात २४ ...

फेरमूल्यांकनाची त्रयस्त समिती रद्द : ४५० शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची वेठबिगारी कायमच
गडचिरोली : ३० जून २०१४ च्या शासन निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २२ विनाअनुदानित माध्यमिक तर दुसऱ्या टप्प्यात २४ अशा एकूण ४६ विनाअनुदानित खासगी माध्यमिक शाळा अनुदानासाठी शासनाने पात्र ठरविल्या. या शाळांचे फेरमूल्यांकन त्रयस्त समितीमार्फत सुरू करण्यात आले होते. मात्र संस्थाचालकांनी मोर्चा काढल्यानंतर शासनाने फेरमूल्यांकनाची त्रयस्त समिती रद्द केली. अनुदानासाठी ४६ शाळा पात्र ठरविण्यात आल्या. मात्र या शाळांना प्रत्यक्षात शासनाने अनुदान लागू केले नाही. परिणामी या शाळांमध्ये कार्यरत ४५० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची वेठबिगारी कायमच आहे.
३० जून २०१४ च्या शासन निर्णयानुसार अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आलेल्या विनाअनुदानित माध्यमिक शाळांमध्ये गडचिरोली तालुक्यातील नवेगाव (मुरखळा), चुरचुरा, पोटेगाव, मारोडा, अहेरी तालुक्यातील बोरी, चामोर्शी तालुक्यातील भाडभिडी, जयरामपूर, मुरखळा (माल), गौरीपूर, मोहुर्ली व घोट तसेच देसाईगंज तालुक्यातील तुळशी, आमगाव, धानोरा तालुक्यातील जांभळी, मुस्का येथील दोन, मेंढाटोला, कोरची तालुक्यातील बिहीटेकला, भीमपूर, कुरखेडा तालुक्यातील गोठणगाव, कराडी आदी शाळांचा समावेश आहे. तसेच ९ फेब्रुवारी २०१५ च्या शासन निर्णयानुसार गडचिरोली तालुक्यातील मुडझा, कोरची तालुक्यातील कोटगुल, बोरी, एटापल्ली तालुक्यातील बुर्गी व चामोर्शी तालुक्यातील नेताजीनगर येथील माध्यमिक शाळांचा समावेश आहे.
शाळा अनुदानाच्या प्रक्रियेदरम्यान जिल्हास्तरीय समितीने संबंधित शाळांच्या मूल्यांकनाचे प्रस्ताव नागपूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयाला पाठविले. त्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार शाळांच्या फेरमूल्यांकनासाठी त्रिसदस्यीय दोन त्रयस्त समित्या गठित करण्यात आल्या. यामध्ये लातूर येथील शिक्षण उपसंचालक व नाशिक येथील शिक्षण उपसंचालकाच्या नेतृत्त्वातील समित्यांचा समावेश आहे. सर्वप्रथम लातूर येथील शिक्षण उपसंचालकाची त्रयस्त समिती गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाली. या समितीने अनुदानासाठी पात्र ठरलेल्या सहा शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन फेरमूल्यांकन केले. यापैकी पाच शाळा या समितीने अनुदानासाठी पात्र ठरविल्या. यासंदर्भात समितीने माध्यमिक शिक्षण विभागाला पत्र देऊन कळविले. त्यानंतर लातूर येथील समितीने शाळांचे फेरमूल्यांकन केले. मात्र या शाळा मूल्यांकनाचा अहवाल माध्यमिक शिक्षण विभागाला अद्यापही प्राप्त झाला नसल्याची माहिती आहे.
या दोन्ही समितींमार्फत शाळांच्या फेरमूल्यांकनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच गडचिरोली जिल्ह्यातील संस्थाचालकांनी मागण्यांसाठी शासनदरबारी मुंबईत मोर्चा काढला. त्यानंतर शासनाने शासनाने सर्वच त्रयस्त समित्या रद्द केल्या. परिणामी अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व तसे घोषित केलेल्या काही शाळांचे फेरमूल्यांकनाची प्रक्रिया थांबली. (स्थानिक प्रतिनिधी)