शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

3 लाख 5 हजार नागरिकांचे करावे लागणार लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 05:00 IST

एकाचवेळी सर्वच नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करून लसीचा तुटवडा जाणवू नये यासाठी शासनाकडून टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्याचा निर्णय घेत आहे. सुरुवातीला आराेग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर यांना लस देण्यात आली. त्यानंतर ६० वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्ष वयापेक्षा अधिक मात्र आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेतला. आता १ एप्रिलपासून ४५ वर्ष वयापेक्षा अधिक वय असलेल्या सर्वच नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्दे१ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांनाच मिळणार काेराेना प्रतिबंधात्मक लस

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : ४५ वर्ष वयावरील सर्वच नागरिकांचे काेराेना लसीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आराेग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात गडचिराेली जिल्ह्यात ४५ वर्ष वयापेक्षा तीन लाख पाच हजार नागरिक आहेत. या सर्वांचे लसीकरण आता करावे लागणार आहे. 
एकाचवेळी सर्वच नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करून लसीचा तुटवडा जाणवू नये यासाठी शासनाकडून टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्याचा निर्णय घेत आहे. सुरुवातीला आराेग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर यांना लस देण्यात आली. त्यानंतर ६० वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्ष वयापेक्षा अधिक मात्र आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेतला. आता १ एप्रिलपासून ४५ वर्ष वयापेक्षा अधिक वय असलेल्या सर्वच नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वयाेगटातील गडचिराेली जिल्ह्यात तीन लाख पाच हजार नागरिक आहेत. लसीकरणाचे उद्दिष्ट वाढल्याने लसीकरणाची गती वाढविण्याचेही आव्हान आराेग्य विभागासमाेर आहे. त्यादृष्टीने आराेग्य विभाग नियाेजन करीत आहे. लसचीही मागणी केंद्र शासनाकडून करावी लागणार आहे.

मागणी एवढा पुरवठा न झाल्यास लसीकरणात खाेडा
सध्या गडचिराेली आराेग्य विभागाकडे २३ हजार काेराेना प्रतिबंधात्मक लसचा साठा उपलब्ध आहे. दर दिवशी सरासरी एक हजार लस दिल्या जातात. म्हणजेच उपलब्ध लस २३ दिवस पुरणार आहेत. १ एप्रिलपासून लस घेणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे लसचा अतिरिक्त साठा ठेवावा लागणार आहे. 

५० केंद्रांवर तीनच दिवस लसीकरण
सध्या ६४ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. जिल्हा रुग्णालय, महिला व बालरुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आराेग्य केंद्र स्तरावर लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र प्राथमिक आराेग्य केंद्र स्तरावर असलेल्या ५० केंद्रांवर साेमवार, बुधवार व गुरुवार या तीनच दिवशी लसीकरण केले जाते.  १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वच नागरिकांचे लसीकरण हाेणार आहे. त्यामुळे लाभार्थींची संख्या वाढणार आहे. ही बाब लक्षात घेऊन पीएचसी केंद्रावर आठवड्याचे सहा दिवस लसीकरण करावे, अशी मागणी आहे. उर्वरित १४ केंद्रांवर शासकीय सुटीवगळता लसीकरण केले जाते.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस