शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरोगाचे १८२२ रूग्ण औषधोपचाराखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST

जर्मन शास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक यांनी २४ मार्च १८८२ मध्ये मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जिवाणूचा शोध लावला. म्हणून २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात १९६२ पासून राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम सुरू करण्यात आला. जिल्हा क्षयरोग केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच क्षयरोग रूग्णालयामध्ये सदर कार्यक्रम राबविल्या जात आहे. १९९२ मध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचा नमूना आढावा घेण्यात आला.

ठळक मुद्देमोफत औषधोपचार : गडचिरोली जिल्ह्यात २००२ पासून सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत रूग्णांसाठी सोयीसुविधा व मोफत औषधोपचार दिला जात असला तरी दरवर्षी नवीन क्षयरूण आढळून येतात. गडचिरोली जिल्ह्यात २०१९ या वर्षात १ हजार ८२२ क्षयरूग्ण शोधून काढण्यात आले. हे सर्व रूग्ण आता नियमित औषधोपचाराखाली आहेत.
जर्मन शास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक यांनी २४ मार्च १८८२ मध्ये मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जिवाणूचा शोध लावला. म्हणून २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात १९६२ पासून राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम सुरू करण्यात आला. जिल्हा क्षयरोग केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच क्षयरोग रूग्णालयामध्ये सदर कार्यक्रम राबविल्या जात आहे. १९९२ मध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचा नमूना आढावा घेण्यात आला. १९९७ मध्ये सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला. २००५ मध्ये सदर कार्यक्रम संपूर्ण देशभरात राबविण्यात आला. १६ ऑक्टोबर २००२ पासून जिल्ह्यात सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. संपूर्ण देशात दररोज ५ हजारवर लोकांना क्षयरोगाची लागण होते. दर दीड मिनिटाला एका व्यक्तीचा क्षयरोगाने मृत्यू होतो. तरूण व कमावत्या वर्गात या रोगाची लागण मोठ्या प्रमाणात दिसून येते. याबाबत जनजागृती अधिक प्रमाणात आहे.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमानुसार २०१५ पर्यंत देशातून क्षयरोग नष्ट करण्याचे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे संपूर्ण देशात दररोज पाच हजार लोकांना लागण होते. दर दीड मिनीटाला एका व्यक्तीचा क्षयरोगाने मृत्यू होतो. तरूण व कमावत्या वर्गात या रोगाची लागण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे आढळून येते. क्षयरोग निदानाकरिता उपलब्ध असलेल्या उपचार पद्धतीचा लाभ घेऊन जिल्हा क्षयरोग मुक्त करावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग नियंत्रण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रूपेश पेंदाम यांनी केले आहे.

क्षयरोगाची लक्षणे व डॉट्स उपचारपद्धती
दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांचा खोकला, संध्याकाळी हलका ताप, वजनात घट होणे, भूक मंदावणे, छातीत दुखणे, थुंकीतून रक्त येणे ही लक्षणे दिसून आल्यास क्षयरोगाचा संशयित रूग्ण समजावा, तसेच थुकी दूषित क्षयरोग रूग्णाच्या सहवासात असणारी व्यक्ती, कुपोषित, रोगप्रतिकारक शक्ती कमी असणारी व्यक्ती, मधुमेह असणारी व्यक्ती, दीर्घकालीन आजारी वृद्ध व्यक्ती आदींना क्षयरोग होण्याची शक्यता असते.
क्षयरूग्णांवर योग्य औषधोपचारासाठी डॉट्स उपचार पद्धती वापरली जाते. या पद्धतीत क्षय रूग्णांवर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समक्ष व देखरेखेखाली प्रमाणिक औषधी दिली जातात. एक दिवसाआड औषध उपचार पद्धतीत बदल होऊन आता दररोज औषधोपचार पद्धती राबविली जात आहे. त्यामुळ रूग्णांना योग्य सोयीसुविधा मिळत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य