शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
3
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
4
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
5
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
6
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
7
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
8
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
10
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
11
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
12
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
13
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
14
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
19
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
20
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
Daily Top 2Weekly Top 5

१८ हजार बालके कुपोषणग्रस्त

By admin | Updated: July 13, 2015 01:52 IST

जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील कुपोषणाची समस्या अजूनही सुटली नसून या तालुक्यांमधील सुमारे १८ हजार १४२ बालके कुपोषणग्रस्त आहेत.

लोकमत विशेष
गडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील कुपोषणाची समस्या अजूनही सुटली नसून या तालुक्यांमधील सुमारे १८ हजार १४२ बालके कुपोषणग्रस्त आहेत. विशेष म्हणजे यातील तीन हजार ४५७ बालके अतिकुपोषित असल्याचे आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.
गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग नक्षलग्रस्त आहे. या भागामध्ये आदिवासी जमातींचे वास्तव्य आहे. कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या वतीने शेकडो योजना राबविण्यात येत असल्या तरी या योजनांचा प्रत्यक्ष लाभ जंगलाने वेढलेल्या गावांमध्ये राहणाऱ्या आदिवासी समुदायातील नागरिकांना होत नाही. कित्येक महिने गावात आरोग्यसेवकच पोहोचत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या योजनांचा लाभ दुर्गम भागातील नागरिकांना मिळत नाही. कमकुवत आर्थिक परिस्थिती व जनजागृतीअभावी लहान मुलांना योग्य पोषण आहार उपलब्ध करून देताना अडचण निर्माण होत आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या मार्फतीने मे महिन्यात कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात सुमारे १८ हजार १४२ बालके कुपोषित असल्याचे आढळून आले. यातील ३ हजार ४५७ बालके अतिकुपोषित आढळून आले. एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, कोरची यासारख्या दुर्गम व नक्षलप्रभावीत तालुक्यांमध्ये सर्वाधिक कुपोषणाची समस्या असल्याचे दिसून येते.
बहुतांश पालक अशिक्षित असल्याने बालकांची कशा पद्धतीने काळजी घ्यावी, त्यांना कोणत्या प्रकारचा पोषण आहार द्यावा, हे माहित नसल्याने कुपोषणाची समस्या तीव्र होते. गरोदर माताही योग्य आहार घेत नाही. त्यामुळे कुपोषणग्रस्त बालक जन्माला येते. कुपोषणमुक्तीसाठी प्रयत्न करीत असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात येत असला तरी कुपोषणाच्या प्रमाणाकडे नजर टाकली असता, हा दावा फोल असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)
दुर्गम भागातील पालकांमध्ये जनजागृती करण्याची गरज
गडचिरोली जिल्ह्यात निरक्षर नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या नागरिकांना लहान बालकाची काळजी कशी घ्यावी, त्याला कोणत्या प्रकारचा पोषण आहार द्यावा, हे माहीत नाही. गरोदरपणातील कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून गरोदर मातांना पोषण आहार पुरविल्या जातो. मातेला पोषण आहार घेण्याबाबत मार्गदर्शनही केले जाते. गरोदरपणाच्या कालावधीत विश्रांती घेणे गरजेचे असतानाही बहुतांश माता नवव्या महिन्यापर्यंत कष्टाची कामे करतात. त्यामुळेही कुपोषणाची समस्या वाढते. प्रसूतीनंतर किमान सहा महिने बाळाला एक-एक तासाच्या कालावधीनंतर स्तनपान करणे गरजेचे असले तरी एकदा शेतावर गेलेली माता सायंकाळशिवाय परतत नाही. तोपर्यंत बाळाला दूध मिळत नाही. त्यामुळेही कुपोषणाची समस्या तीव्र होत चालली आहे. याबाबत जनजागृती करण्याबरोबरच त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधासुद्धा पुरविण्यात याव्या, अशी मागणी आहे.
गडचिरोली जिल्ह्यात निरक्षर नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या नागरिकांना लहान बालकाची काळजी कशी घ्यावी, त्याला कोणत्या प्रकारचा पोषण आहार द्यावा, हे माहीत नाही. गरोदरपणातील कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून गरोदर मातांना पोषण आहार पुरविल्या जातो. मातेला पोषण आहार घेण्याबाबत मार्गदर्शनही केले जाते. गरोदरपणाच्या कालावधीत विश्रांती घेणे गरजेचे असतानाही बहुतांश माता नवव्या महिन्यापर्यंत कष्टाची कामे करतात. त्यामुळेही कुपोषणाची समस्या वाढते. प्रसूतीनंतर किमान सहा महिने बाळाला एक-एक तासाच्या कालावधीनंतर स्तनपान करणे गरजेचे असले तरी एकदा शेतावर गेलेली माता सायंकाळशिवाय परतत नाही. तोपर्यंत बाळाला दूध मिळत नाही. त्यामुळेही कुपोषणाची समस्या तीव्र होत चालली आहे. याबाबत जनजागृती करण्याबरोबरच त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधासुद्धा पुरविण्यात याव्या, अशी मागणी आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मे महिन्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार गडचिरोली जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या १८ हजार १४२ असल्याचे दर्शविण्यात आले असले तरी कुपोषित बालकांचा प्रत्यक्षात आकडा यापेक्षा अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहुतांश लहान गावांमध्ये अजूनही अंगणवाडी केंद्र स्थापन करण्यात आले नाही. त्यामुळे तेथील बालक व गरोदर मातांना पोषण आहार मिळत नाही. त्याचबरोबर त्या गावातील कुपोषित बालकांची संख्याही आरोग्य विभागाला नेमकी माहीत पडत नाही.