शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १६०० गावे काेराेनामुक्त, उरले केवळ ३४ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 05:00 IST

गडचिराेली येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात सीझर व नाॅर्मल प्रसूतीसाठी दरराेज अनेक महिला भरती हाेतात. गडचिराेली जिल्ह्यासह लगतच्या चंद्रपूर, गाेंदिया, भंडारा जिल्ह्यातील महिला रुग्ण या रुग्णालयात येतात. जिल्ह्याबाहेरील भागातून आलेल्या प्रत्येक गर्भवती महिलांची काेराेना चाचणी केली जात आहे. यात काही महिलांचा अहवाल पाॅझिटिव्ह आढळून येत आहे. गडचिराेली तालुक्यात सध्या १८ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दिलीप दहेलकरलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : आराेग्य यंत्रणेच्या परिश्रमामुळे आणि प्रशासनाने केलेल्या उपाययाेजनांमुळे गडचिराेली जिल्हा काेराेनामुक्तीच्या वाटेवर आहे. जिल्ह्यात एकूण जवळपास १६५० गावे आहेत. यापैकी १६१० गावे काेराेनामुक्त झाली असून केवळ १५ ते १७ गावात काेराेनाबाधित रुग्ण उरले आहेत. विशेष म्हणजे १२ पैकी ९ तालुके कोरोनामुक्त झाले असून, सद्यस्थितीत तीनच तालुके काेराेनाच्या सावटात आहेत. सध्या जिल्हाभरात ३४ कोरोना रुग्ण शिल्लक राहिले आहेत. चामाेर्शी, धानाेरा, मुलचेरा, गडचिराेली या चार तालुक्यांत काेराेनाबाधित रुग्ण आहेत. आराेग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत आरमाेरी तालुक्यात एक, भामरागड तालुक्यात एक, धानाेरा तालुक्यात दाेन बाधित रुग्ण आहेत. याशिवाय गडचिराेली तालुक्यात १८, मुलचेरा ४ व चामाेर्शी तालुक्यात ८ रुग्ण आहेत. जिल्ह्यातील अहेरी, एटापल्ली, कुरखेडा, काेरची, सिराेंचा व देसाईगंज हे सहा तालुके काही दिवसांपूर्वीच १०० टक्के काेराेनामुक्त झाले आहेत.सध्या ३४ रूग्णांवर उपचार सुरू असून याेग्य खबरदारी घेतल्यास जिल्ह्यातील काेराेना रूग्णांचे प्रमाण शुन्यावर येऊ शकते.

दरराेज ४०० वर चाचण्यागडचिराेली जिल्हास्तरासह तालुकास्तरावरील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात मिळून दरराेज ४०० पेक्षा जास्त नागरिकांची काेरोना तपासणी केली जात आहे. १७ ऑगस्ट राेजी मंगळवारी जिल्हाभरात ३९६ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या. यापैकी केवळ एक रुग्ण बाधित आढळला आहे. 

सक्रिय रुग्णांचे प्रमाण घटलेगडचिराेली जिल्ह्यात काेराेना रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण सद्यस्थितीत ९७.४६ टक्के आहे. क्रियाशील (सक्रिय) रुग्णांचे प्रमाण घटले असून ते ०.११ टक्क्यांवर आले आहे. गडचिराेली जिल्हा काेराेनामुक्तीच्या वाटेवर असल्याने शासन व प्रशासनाने येथील निर्बंध उठविले आहेत.

जिल्ह्याबाहेरील महिला आढळताहेत बाधितगडचिराेली येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात सीझर व नाॅर्मल प्रसूतीसाठी दरराेज अनेक महिला भरती हाेतात. गडचिराेली जिल्ह्यासह लगतच्या चंद्रपूर, गाेंदिया, भंडारा जिल्ह्यातील महिला रुग्ण या रुग्णालयात येतात. जिल्ह्याबाहेरील भागातून आलेल्या प्रत्येक गर्भवती महिलांची काेराेना चाचणी केली जात आहे. यात काही महिलांचा अहवाल पाॅझिटिव्ह आढळून येत आहे. गडचिराेली तालुक्यात सध्या १८ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात महिला रुग्णालयात आलेल्या रुग्णांचा समावेश आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या