शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंज-गडचिरोली मार्गाच्या नुतनीकरणासाठी १६ कोटी मंजूर

By admin | Updated: September 6, 2016 00:54 IST

देसाईगंज-आरमोरी-गडचिरोली या राज्य महामार्गाच्या दुरूस्तीसाठी १६ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडून निधीआरमोरी : देसाईगंज-आरमोरी-गडचिरोली या राज्य महामार्गाच्या दुरूस्तीसाठी १६ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर निधी मिळविण्यासाठी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. राष्ट्रीय महामार्ग रस्ते विकास विभाग भंडाराच्या अंतर्गत येत असलेल्या लाखांदूर-देसाईगंज-आरमोरी बर्डी टी पार्इंटपर्यंतच्या रस्ता नुतनीकरणासाठी ८ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग रस्ते विकास विभाग गडचिरोलीच्या अंतर्गत येत असलेल्या आरमोरी बर्डी टी पार्इंट ते गडचिरोली इंदिरा चौकापर्यंतच्या मार्गासाठी ८ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. कामाची निविदा लवकरच काढण्यात येऊन कामाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या मार्गाचे मागील तीन ते चार वर्षांपासून नुतनीकरण रखडले होते. त्यामुळे या मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले होते. नुतनीकरणासाठी आमदारांनी पाठपुरावा करावा, अशी मागणी होत होती. केंद्र सरकारने हा निधी उपलब्ध करून दिला आहे. (शहर प्रतिनिधी)देसाईगंज-आरमोरी-गडचिरोली महामार्ग नुतनीकरणासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे राष्ट्रीय रस्ते विकास विभागाने १६ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच या रस्त्याच्या नुतनीकरणाच्या कामाला सुरूवात होणार आहे. खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त होते. त्यामुळे नुतनीकरण आवश्यक झाले होते.- क्रिष्णा गजबे, आमदार, आरमोरी क्षेत्र