व्यसनी १५ रुग्णांनी घेतला उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:52 IST2021-02-05T08:52:20+5:302021-02-05T08:52:20+5:30

भामरागड : तालुक्यातील मोकेला येथे गावकऱ्यांच्या मागणीनुसार मुक्तिपथ अभियानातर्फे एक दिवसीय व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या ...

15 addicted patients received treatment | व्यसनी १५ रुग्णांनी घेतला उपचार

व्यसनी १५ रुग्णांनी घेतला उपचार

भामरागड : तालुक्यातील मोकेला येथे गावकऱ्यांच्या मागणीनुसार मुक्तिपथ अभियानातर्फे एक दिवसीय व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून एकूण १५ रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते सीताराम मडावी यांनी शिबिराला भेट देऊन मार्गदर्शन केले.

साईनाथ मोहुर्ले यांनी उपचाराला आलेल्या रुग्णांना समुपदेशन केले. दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषधोपचार घेणे आदींबाबत रुग्णांना मार्गदर्शन केले. संयोजिका पूजा येल्लूरकर यांनी रुग्णांची माहिती घेतली. युवकांनी व्यसनाला बाजूला सारून व्यसनमुक्त गाव निर्माण करावे. जास्तीत जास्त व्यसनी रुग्णांनी शिबिराचा लाभ घेत दारूमुक्त व्हावे, असे आवाहन यावेळी सीताराम मडावी यांनी केले. क्लिनिकचे नियोजन व व्यवस्थापन तालुका प्रेरक आबिद शेख यांनी केले. यशस्वीतेसाठी गाव पाटील रावजी येरमा, उपसरपंच तलांडी, रावजी मडावी यांनी सहकार्य केले.

Web Title: 15 addicted patients received treatment