शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे 14 कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 05:00 IST

एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मुख्य मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ३० ऑक्टाेबरपासून कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. अकराव्या दिवशीही आंदाेलन सुरूच आहे. सर्वच चालक व वाहक संपावर असल्याने एसटीची सेवा ३० ऑक्टाेबरपासूनच ठप्प पडली आहे. संप मागे घेण्याबाबत अनेक वेळा आवाहन करण्यात आले. मात्र, कर्मचारी आपल्या निर्णयावर ठाम असून, जाेपर्यंत  विलीनीकरणाची मागणी पूर्ण हाेत नाही, ताेपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : बेकायदेशीर संपात सहभागी झाल्याच्या कारणावरून गडचिराेली, अहेरी व ब्रह्मपुरी या तीन आगारांतील १४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कारवाईमुळे काेणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी बसस्थानक परिसरात पाेलिसांचा चाेख बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मुख्य मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ३० ऑक्टाेबरपासून कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. अकराव्या दिवशीही आंदाेलन सुरूच आहे. सर्वच चालक व वाहक संपावर असल्याने एसटीची सेवा ३० ऑक्टाेबरपासूनच ठप्प पडली आहे. संप मागे घेण्याबाबत अनेक वेळा आवाहन करण्यात आले. मात्र, कर्मचारी आपल्या निर्णयावर ठाम असून, जाेपर्यंत  विलीनीकरणाची मागणी पूर्ण हाेत नाही, ताेपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. संपकरी कर्मचाऱ्यांवर पहिली कारवाई करताना संपात सहभागी १४ कर्मचाऱ्यांना विभागीय वाहतूक अधीक्षकांनी निलंबित केले आहे. यामध्ये गडचिराेली आगारातील तीन, अहेरी सहा व ब्रह्मपुरी आगारातील पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरची ही पहिली कारवाई आहे. संप पुढेही चालू राहिल्यास आणखी काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड काेसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. गडचिराेली विभागासह राज्यातील इतर विभागांमध्येही संपकर्त्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मागील ११ दिवसांपासून संप सुरू असल्याने एसटीचे माेठे नुकसान हाेत आहे. ऐन दिवाळीच्या कालावधीत संप पुकारल्याने या कालावधीत मिळणाऱ्या उत्पन्नापासून एसटीला वंचित राहावे लागले आहे. संपामुळे एसटीची आर्थिक स्थिती अतिशय चिंताजनक झाली आहे. 

अनुचित घटना टाळण्यासाठी पाेलीस बंदाेबस्तनिलंबनाची कारवाई केल्यानंतर काेणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी एसटी विभागाने पाेलीस बंदाेबस्त मागविला हाेता. दिवसभर बसस्थानक परिसरात पाेलिसांचा पहारा हाेता. मात्र, निलंबनाची यादी बसस्थानकावर चिकटविल्यानंतरही संप शांततेत सुरू हाेता. काेणतीही अनुचित घटना घडली नाही.

बडतर्फ केले तरी संप सुरूच राहणारसंपात सहभागी झाल्यानंतर निलंबनाची कारवाई केली जाणार, याची खात्री पूर्वीच हाेती. मात्र, या कारवाईला न घाबरता संप सुरू ठेवला आहे. निलंबनच नाही तर सेवेतून बडतर्फ केले तरी आंदाेलन मागे घेतले जाणार नाही, अशी प्रतिक्रिया आंदाेलक कर्मचाऱ्यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना दिली आहे. 

 

टॅग्स :state transportएसटी