शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

आणखी मिळणार १२५ सौर कृषिपंप

By admin | Updated: July 22, 2015 02:23 IST

केंद्र शासनाच्या सौर कृषिपंप योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आणखी १२५ सौर कृषिपंप मंजूर करण्यात आले ...

केंद्र शासनाची योजना : वीज कंपनी करणार सहकार्य
गडचिरोली : केंद्र शासनाच्या सौर कृषिपंप योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आणखी १२५ सौर कृषिपंप मंजूर करण्यात आले असून त्यासाठी लवकरच अर्जांची मागणी केली जाणार आहे. यापूर्वीही नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ११७ सौर कृषिपंप बसविण्यात आले असून सदर कृषीपंप सुरू सुध्दा झाले आहेत.
औष्णीक वीज निर्मितीमुळे मोठ्या प्रमाणात वायूप्रदुषण होत असून याचे परिणाम संपूर्ण सजीव जातीला भोगावे लागत आहे. त्याचबरोबर भविष्यात कोळशाची टंचाई जाणवण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र शासनाने संपूर्ण अपांरपरिक ऊर्जास्त्रोतांच्या माध्यमातून वीज निर्मिती करण्याचे धोरण अवलंबिले आहे. या अंतर्गत संपूर्ण देशात केंद्र शासनाने एक लाख सौर कृषिपंप मंजूर केले असून त्यासाठी सुमारे ४०० कोटी रूपये आरक्षित केले आहेत. महाराष्ट्र राज्याला ७ हजार ५४० नग सौर कृषीपंप मंजूर केले आहेत.
योजनेच्या निकषानुसार या योजनेचा लाभ देण्यासाठी अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, गडचिरोली व वर्धा या आत्महत्याग्रस्त व आदिवासी बहूल जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी १२५ सौर कृषिपंप मंजूर झाले आहेत. या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांकडून अर्जांची मागणी लवकरच करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे विहीर असणे गरजेचे आहे. शेतकरी हा अतिदुर्गम भागातील असावा, पारंपरिक पध्दतीने विद्युतीकरण झालेले नसावे, वन विभागाचा अडथळा नसावा, पाच एकर पेक्षा अधिक शेती असू नये, लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे कृषिपंप आहे, अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. (नगर प्रतिनिधी)
महावितरण भरणार कर्ज
कृषिपंपासाठी केंद्र शासन ३० टक्के अनुदान देणार आहे. पाच टक्के अनुदान राज्य शासन भरणार आहे. पाच टक्के हिस्सा लाभार्थ्याला भरायचा आहे. तर उर्वरित ६० टक्के रक्कम लाभार्थ्याला कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून दिले जाणार आहे. या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी महावितरणवर राहणार आहे. महावितरण टप्प्याटप्प्याने कर्जाची परतफेड करणार आहे.
३ ते ७.५ अश्वशक्तीचे मिळणार पंप
या योजनेंतर्गत तीन अश्वशक्ती एसी, तीन अश्वशक्ती डीसी, पाच अश्वशक्ती एसी, पाच अश्वशक्ती डीसी, ७.५ अश्वशक्ती एसी पंपाचा पुरवठा केला जाणार आहे.