१० युवकांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:35 IST2021-01-13T05:35:49+5:302021-01-13T05:35:49+5:30

गडचिराेली : स्थानिक शिवाजी महाविद्यालयाच्या सुवर्ण महाेत्सवी वर्ष, युवा दिन व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा ...

10 youths donated blood | १० युवकांनी केले रक्तदान

१० युवकांनी केले रक्तदान

गडचिराेली : स्थानिक शिवाजी महाविद्यालयाच्या सुवर्ण महाेत्सवी वर्ष, युवा दिन व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा याेजना विभागाच्यावतीने शिवाजी महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात १० स्वयंसेवकांनी रक्तदान केले. रक्तदात्यांमध्ये सूरज माेहुर्ले, नागेश गेडाम, अंकुश मेश्राम, दानिश सय्यद, प्रज्ज्वल उराडे, प्रफुल्ल भांडेकर, पवन भाेयर, अभय कुकडे, हर्षद वैरागडे, जतीन पुत्कलवार यांचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयातील रक्ताची गरज लक्षात घेऊन पुन्हा ४५ जण रक्तदान करणार आहेत. रक्तदान शिबिर महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.बी.एस.चिकटे, रासेयाे कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.जे.जी.उईके यांच्या नेतृत्वात घेण्यात आले. रक्तदान शिबिराला जिल्हा रुग्णालयातील रक्त संक्रमण विभागाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. किशाेर ताराम, सतीश तडकलावार, विजय पत्तीवार, मुरलीधर पेद्दीवार, पीयूष कांबळे, संदीप तुमरी, प्रतीक्षा काटेंगे हे उपस्थित हाेते. यशस्वीतेसाठी चंचल राेहणकर, सुरज माेहुर्ले यांच्यासह इतर स्वयंसेवकांनी सहकार्य केले.

Web Title: 10 youths donated blood