वसतिगृहातील १० विद्यार्थी काेराेना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:34 IST2021-03-08T04:34:30+5:302021-03-08T04:34:30+5:30

रविवारी, २९ नवीन कोरोनाबाधित आढळून आले, तसेच २३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील २४ जण ...

10 students in the hostel are positive | वसतिगृहातील १० विद्यार्थी काेराेना पाॅझिटिव्ह

वसतिगृहातील १० विद्यार्थी काेराेना पाॅझिटिव्ह

रविवारी, २९ नवीन कोरोनाबाधित आढळून आले, तसेच २३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील २४ जण आहेत. एकूण काेराेनाबाधितांची संख्या ९ हजार ६९२ झाली आहे. त्यापैकी ९ हजार ४०८ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या १७६ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. १०८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०७ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण १.८२ टक्का, तर मृत्यू दर १.११ टक्का झाला. नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील रेव्हेन्यू कॉलनी १, एमआयडीसी रोड टी- पॉइंट २, नवेगाव ४, कोटगल ४, गोकुलनगर १, शिवाजी हायस्कूल १, झेडपी १, मुलांचे वसतिगृह १०, अहेरी तालुक्यातील नागेपल्ली १, आरमोरी तालुक्यातील वैरागड २, कुरखेडा तालुक्यातील मालडुगी १, मुलचेरा तालुक्यातील विवेकनंदपूर १ यांचा समावेश आहे.

Web Title: 10 students in the hostel are positive