शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी, मग शाळांचे स्थलांतर नाही; महाराष्ट्र सरकारचे नवे धोरण, अटी व अंतरमर्यादा लागू 
2
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
3
"मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
4
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
5
India and UAE: एमिरेट्स NBD ची झाली RBL बँक; ३ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक डीलला सरकारची मंजुरी
6
हबिबा फसवणूक प्रकरण : आधी प्रॉपर्टी टॅक्सची नोटीस पाठवली, नंतर जाळ्यात ओढले, रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये फुटले महेशचे बिंग
7
Mamata Banerjee : "ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या
8
दिवाळीच्या तोंडावर नोकरीवरून हाकलले; ६ महिन्यांनी त्याच कंपनीने डेटासाठी फोन केला अन्.. 
9
'डार्लिंग, तुझ्यासाठी पेपरची व्यवस्था केलीये..."; विद्यार्थिनीकडे संतापजनक मागणी, लखनौ विद्यापीठात खळबळ
10
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
11
‘आनंद’ मरा नहीं, आनंद कभी नहीं मरते...!
12
सिडकोकडील स्थानके मध्य रेल्वेकडे देणार, नवी मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार सुखकर
13
स्वतःचे कोचिंग सेंटर सुपरहिट करण्यासाठी कुलकर्णीने लीक केला NEETचा पेपर; पण विद्यार्थ्याने एक चूक केली अन्..
14
Hantavirus माणसाच्या शरीरात किती काळ राहतो? वैज्ञानिकांनाही मिळेना उत्तर; संशोधन सुरू
15
काम पूर्ण होण्याआधीच मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली सुरू; खड्डे, सेवारस्ते आणि पुलांची कामे रखडलेलीच
16
पीएम मोदींच्या आवाहनानंतर परकीय चलन साठ्यात प्रचंड वाढ; सरकारी तिजोरीत आले ₹६०,००० कोटी
17
गाझामध्ये इस्रायलचा थरकाप उडवणारा एअर स्ट्राईक; हमासच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडरला केले टार्गेट
18
Mumbai Crime: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी बोलावले, दारू पाजून गळा चिरला; अनैतिक संबंधांचा संशय,  फरार पतीला अटक
19
इंटरनेटवरही इराणचा टोल? समुद्राखालील ५००हून अधिक केबलमुळे डेटासेवा संकटात
20
जगभर: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं नवं रूप! शिक्षिकेसमोर झाले लीन
Daily Top 2Weekly Top 5

सौर ऊर्जेवरील १० योजनांतून पाणीपुरवठा नाही

By admin | Updated: May 30, 2015 01:54 IST

राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत वीज नसलेल्या कुरखेडा तालुक्यातील ३४ गावांमध्ये सौरउर्जेवर दुहेरी हातपंप नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली.

सौरदिवे बंद : गावात अंधार
कुरखेडा : राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत वीज नसलेल्या कुरखेडा तालुक्यातील ३४ गावांमध्ये सौरउर्जेवर दुहेरी हातपंप नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र सद्यस्थितीत १० गावातील पाणी पुरवठा योजना बंद आहे. तर काही गावात वॉल्व लिकेज आहे. त्यामुळे नागरिकांना भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजनेमध्ये चिनेगाव, कुंभीटोला, मोर्शी, भगवानपूर, चिचटोला, महाजन टोला, वाशिम, सोनेरांगी, खापरी, मोहगाव आदी गावांचा समावेश आहे. लाखो रूपये खर्च करून शासनाने सौरउर्जेवर आधारित नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली. मात्र अल्पावधीतच काही ठिकाणच्या योजना बंद असल्याने शासनाचा लाखोंचा खर्च व्यर्थ गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
पर्यावरण संतुलीत समृध्द ग्राम योजना, दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत सन २०१२-१३ व २०१३-१४ या दोन वर्षात कुरखेडा तालुक्यात २५ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावांमध्ये १७१ सौर पथदिवे लावण्यात आले. मात्र यापैकी अर्धे अधिक सौर पथदिवे बंद पडले असल्याने संबंधित गावांमध्ये अंधार पसरला आहे.
जिल्हा परिषद सीईओंना निवेदन
कुरखेडा तालुक्यातील विविध गावातील गेल्या अनेक महिन्यापासून सौर पथदिवे बंद आहेत. तसेच दहा गावातील सौरउर्जेवरील नळ पाणी पुरवठा योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. जि.प. प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन बंद असलेल्या पाणी पुरवठा योजना व सौर पथदिवे सुरू करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी कुरखेडाचे पं.स. सदस्य चांगदेव फाये यांनी निवेदनाद्वारे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांच्याकडे केली आहे.