शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

१ हजार १०१ प्रकरणे निकाली

By admin | Updated: May 1, 2017 02:12 IST

जिल्हाभरातील महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एप्रिल ते ३१ मार्च २०१७ अखेरपर्यंत वर्षभराच्या

वर्षभरात ९३ लाखांचा दंड वसूल : गौण खनिज खनन गडचिरोली : जिल्हाभरातील महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एप्रिल ते ३१ मार्च २०१७ अखेरपर्यंत वर्षभराच्या कालावधीत गौण खनिजाच्या अवैध खनन व वाहतुकीबाबत धाडसत्र राबवून संबंधित गौण खनिज तस्करांकडून एकूण ९३ लाख ५८ हजार ८७६ रूपयांचा दंड वसूल केला. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्षभरात गौण खनिजाच्या अवैध खनन व वाहतुकीबाबत एकूण १ हजार १०१ प्रकरणे निकाली काढली. जिल्ह्यातील रेतीघाटावरून शासनाच्या नियमानुसार रेती व इतर गौण खनिजाचे खनन व वाहतूक होणे आवश्यक आहे. याबाबत महसूल विभाग व जिल्हा खनिकर्म विभाग नियंत्रण ठेवत असते. गडचिरोली जिल्ह्यातील रेतीघाटाची आॅनलाईन लिलाव प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालय अधिनस्त असलेल्या जिल्हा खनिकर्म विभागाच्या वतीने दरवर्षी राबविल्या जाते. घाटाची विक्री झाल्यानंतर संबंधित कंत्राटदारांना त्या घाटातून रेतीचे खनन व वाहतूक करण्याचा परवाना दिला जातो. मात्र शासनाचे नियम असतानासुद्धा जिल्ह्यातील काही कंत्राटदार क्षमतेपेक्षा अधिक व जास्तीच्या क्षेत्रात रेतीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन करतात. काही कंत्राटदार टीपीपेक्षा अधिक रेती व इतर गौण खनिजाचे खनन व वाहतूक करतात. या अवैध खनन व वाहतुकीला पायबंद घालण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक गठित करण्यात आले आहे. महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गडचिरोली उपविभागात गेल्या वर्षभरात १७२ प्रकरणे निकाली काढून या प्रकरणातून संबंधित कंत्राटदाराकडून १९ लाख १४ हजार ६४० रूपयांचा दंड वसूल केला. या उपविभागात गडचिरोली व धानोरा तालुक्याचा समावेश आहे. चामोर्शी व मुलचेरा तालुक्याचा समावेश असलेल्या चामोर्शी उपविभागात महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सन २०१६-१७ या वर्षभरात धाडसत्र राबवून एकूण १७८ प्रकरणे निकाली काढली. या प्रकरणातून संबंधित कंत्राटदाराकडून १३ लाख ९२ हजार ५० रूपयांचा दंड वसूल केला. देसाईगंज व आरमोरी तालुक्याचा समावेश असलेल्या कुरखेडा उपविभागातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वर्षभरात ४७० प्रकरणे निकाली काढून एकूण १७ लाख ३८ हजार ७२० रूपयांचा दंड वसूल केला. कुरखेडा व कोरची तालुक्याचा समावेश असलेल्या कुरखेडा उपविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवैध खनन व वाहतुकीबाबतचे १०९ प्रकरणे निकाली काढून एकूण ७ लाख ३ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल केला. अहेरी व सिरोंचा तालुक्याचा समावेश असलेल्या अहेरी उपविभागात अवैध खनन व वाहतुकीबाबत एकूण १३४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून ३३ लाख ३४ हजार ५६६ रूपयांचा दंड संबंधित कंत्राटदाराकडून वसूल करण्यात आला. एटापल्ली व भामरागड तालुक्याचा समावेश असलेल्या एटापल्ली उपविभागाच्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वर्षभरात धाडसत्र राबवून गौण खनिजाचे अवैध खनन व वाहतुकीबाबत एकूण ३८ प्रकरणे निकाली काढली व संबंधित कंत्राटदाराकडून २ लाख ७५ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल केला. याबाबतचे सर्वाधिक प्रकरणे देसाईगंज उपविभागाने निकाली काढले असून याची संख्या ४७० आहे. कारवाई सातत्याने सुरू आहे. (स्थानिक प्रतिनिधी) कारवाईत अहेरी उपविभाग अव्वल गडचिरोली जिल्ह्याच्या बहुतांश भागात रेती व इतर गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक करण्याचा प्रकार प्रचंड वाढला आहे. रेती व इतर गौण खनिजाची तस्करी करून मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ पदरात पाडून घेण्यासाठी अनेक कंत्राटदार व तस्कर प्रयत्न करतात. गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात धाडसत्र राबवून सर्वाधिक दंड वसूल करण्याच्या कामात अहेरी उपविभाग आघाडीवर आहे. अहेरी तालुक्यातील महसूल विभागाने ३६ प्रकरणे निकाली काढून ३ लाख ८८ हजार ८०० तर सिरोंचा तालुक्यातील महसूल विभागाने ९८ प्रकरणे निकाली काढून २९ लाख ४५ हजार ७६६ रूपयांचा दंड वसूल केला. अहेरी उपविभागाने सर्वाधिक ३३ लाख ३४ हजार ५६६ रूपयांचा दंड वसूल केला. अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीच्या कारवाईत इतर उपविभाग माघारले आहे.