शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

एलसीबीत कर्मचारीच झाले शिरजोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 06:00 IST

एक महिला कॉन्स्टेबलही या कामात साथ देत आहे. या वसुलीसाठी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर केला जात असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. यामुळे नव्याने रुजू झालेल्या एलसीबीच्या अधिकाऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांच्या नावे दमदाटी : दारू आणि सट्टावाल्यांकडून करताहेत वसुली?

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या अनेक दिवसांपासून अधिकाऱ्यांच्या नेतृत्वापासून वंचित राहिलेल्या स्थानिक गुन्हे शाखेत आता पोलीस निरीक्षक म्हणून उल्हास भुसारी हे अधिकारी रुजू झाले आहेत. मात्र अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांची शिरजोरी कायम आहे. विशिष्ट दारू आणि सट्टा व्यावसायिकांकडून ते नवीन अधिकाऱ्यांच्या नावे वसुली करीत असल्याचा प्रकार पुढे आल्यामुळे एलसीबीचे नेतृत्व या कर्मचाऱ्यांकडे आहे की अधिकाऱ्यांकडे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्हा मुख्यालयासह आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, चामोर्शी, आष्टी या भागात दारूची आवक जास्त होते. काही व्यावसायिकांशी जुळलेल्या हितसंबंधामुळे स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक उपनिरीक्षक दर्जाचा कर्मचारी दारू-सट्टा व्यावसायिकांकडून वसुली करीत आहे. एक महिला कॉन्स्टेबलही या कामात साथ देत आहे. या वसुलीसाठी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर केला जात असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. यामुळे नव्याने रुजू झालेल्या एलसीबीच्या अधिकाऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सध्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हाभरात दारूची आवक वाढत आहे. त्यामुळे या व्यवसायात अडकलेल्या लोकांना अधिकाऱ्यांच्या नावे परस्पर धमकावत कमी वेळात जास्त वसुली करण्याकडे काही कर्मचाºयांचा कल वाढला आहे.जुन्या कर्मचाऱ्यांचे हितसंबंधअनेक दिवस स्थानिक गुन्हे शाखेचे नेतृत्व करण्यासाठी पोलीस निरिक्षक दर्जाचे अधिकारी नव्हते. त्याचा गैरफायदा घेत काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे अवैध व्यावसायिकांशी हितसंबंध जुळले. आता अधिकारी रुजू झाल्यानंतरही त्यांची ती चटक गेलेली नाही. त्यामुळे या शाखेत दोन वर्षांपासून कार्यरत कर्मचाऱ्यांना तातडीने दूर करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याशिवाय त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या काही नवीन कर्मचाऱ्यांवरही अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, अशी अपेक्षा केली जात आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदीCrime Newsगुन्हेगारी