शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

Til Ladu Recipe : मकरसंक्रांत स्पेशल तिळाचे लाडू, एकदा खाल खातच रहाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 17:15 IST

Til Ladu Recipe : नवीन वर्षाचा पहिला सण अगदी काही दिवसांवर  येऊन ठेपला आहे.

नवीन वर्षाचा पहिला सण अगदी काही दिवसांवर  येऊन ठेपला आहे. सगळ्यांच्या घरात विचार चालला आहे की या वर्षी मकरसंक्रात कशी साजरी करायची. पण आपण कितीही नाविन्यपूर्ण पध्दतीने  सण साजरा करण्याचं ठरवलं तरी  खाद्यसंस्कृती मात्र वर्षानुवर्ष  तशीच राहत असते.   मकरसंक्रातीनिमित्त जर तुम्हीसुध्दा तिळाचे लाडू तयार करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला  तिळाच्या लाडूंची खास रेसेपी सांगणार आहोत. या पध्दतीने जर तुम्ही लाडू बनवाल तर  घरातील सगळी मंडळी तुमच्यावर खूश झाल्याशिवाय राहणार नाही.

अनेकदा तिळाचे लाडू तयार करत असताना कडक होतात तसंच गुळाचं प्रमाण कमी जास्त झाल्यामुळे  जास्त गोड होतात. त्यामुळे तुमचे दात दुखण्याचा धोका असतो. असं होऊ नये म्हणून आज आम्ही तुम्हाला तिळाच्या लाडूंची मस्त परफेक्ट रेसीपी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया तिळाच्या लाडूंची साहीत्य आणि कृती.

(image credit- lazy2cook)

साहित्य-

१/२ किलो तिळ, १/२ किलो चिकीचा गूळ, १ ते दिड वाटी शेंगदाण्याचे कूट,१ वाटी किसून भाजलेले सुकं खोबरं, १/२ वाटी चण्याचं डाळं, १ चमचा वेलची पूड, १ ते २ चमचे तूप.

कृती

तिळ व्यवस्थित भाजून घ्यावेत. गॅसवर एक भांडे ठेवावे त्या भांड्यात चिकीचा गूळ घ्यावा. थोडे तूप घालावे. गूळाचा गोळीबंद पाक करावा. सतत ढवळत राहावे, गूळ पूर्ण पातळ झाला कि थोड्या वेळाने तो फेसाळतो.पाक गोळीबंद झाला आहे कि नाही हे पाहण्यासाठी गूळाचा पाक फेसाळला कि गॅस बारीक करावा. एका वाटीत गार पाणी घ्यावे. त्यात एक थेंब पाक घालावा. बोटाने तो पाक हातात घेऊन त्याची गोळी करावी आणि वाटीतल्या पाण्यात तो गोळा खडा मारल्यासारखा टाकावा. जर वाटीचा "टण्णं" असा आवाज आला तर पाक तयार आहे असे समजावे. 

पाक गोळीबंद झाला कि त्यात भाजलेले तिळ, दाण्याचा कूट, भाजलेले सुके खोबरे, चण्याचे डाळं, वेलची पूड घालून निट ढवळावे, आणि गरम असतानाच लाडू वळावेत. लाडू वळताना हाताला थोडे तूप लावावे ज्यामुळे गरम मिश्रण हाताला चिकटणार नाही.

टॅग्स :Receipeपाककृतीfoodअन्नMakar Sankrantiमकर संक्रांती