शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
4
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
5
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
6
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
7
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
8
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
9
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
10
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
11
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
12
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
13
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
14
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
15
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
16
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
17
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
18
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
19
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
20
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील या हॉटेलमध्ये मिळतोय वेंन्डिग मशीनमधून स्वादिष्ट पिझ्झा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 15:28 IST

पिझ्झा फार आवडतो पण त्यासाठी वाट पाहणं मान्य नाही? मुंबईतील या हॉटेलमध्ये आहे पिझ्झा वेंडींग मशिन

ठळक मुद्देखरंतर पिझ्झा वेंडिंग मशीन इटालियन देशातच आढळून येतातभारतात अद्यापही या मशिनची सुरुवात झाली नव्हती. पण येस पिझ्झा या हॉटेलने भारतातलं पहिलं पिझ्झा वेंडिंग मशीनला सुरुवात केली आहे.

मुंबई : तुम्ही पिझ्झा वेंन्डिग मशिनविषयी कधी ऐकलंय का? कांदिवलीतील एका हॉटेलमध्ये असं पिझ्झा वेंन्डिग मशीन ठेवण्यात आलंय. अवघ्या सहा मिनिटात तुम्हाला हवा असलेला पिझ्झा तुमच्यासमोर आलेला असेल.

आणखी वाचा - अंतराळात झाली अशी पिझ्झा पार्टी, तुम्हीही व्हिडिओ नक्की पहा

कांदिवलीतील पंचशील गार्डनजवळील राज ऑर्केडमध्ये ‘येस पिझ्झा’ नावाचं हॉटेल आहे. साहजिकच हे हॉटेल इतर हॉटेलांपेक्षा फार निराळं आहे. पिझ्झाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत जातेय. हा मुळचा इटालियन पदार्थ असला तरीही अनेक भारतीय या पदार्थाच्या प्रेमात आहेत. भारतीयांकडून पिझ्झाची वाढती मागणी पाहता अनेक परदेशी कंपन्याही इकडे आल्या. डॉमिनोज, पिझ्झा हट, स्मोकिंग जोज अशा विविध कंपन्या पिझ्झासाठी प्रसिद्ध आहेत. पिझ्झाची वाढती मागणी पाहता या कंपन्यांनी आपल्या किंमतीही वाढवल्या. परिणामी अनेक स्थानिक हॉटेल्स व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपापल्या पद्धतीने पिझ्झा बनवायला सुरुवात केलीय. त्यामुळे मुंबईसारख्या शहरात अनेक हॉटेल्समध्ये अगदी स्वादिष्ट पिझ्झा मिळतो. इटालियन पदार्थाला भारतीय टच देऊनही पिझ्झा बनवण्याची हटके स्टाईल काहीजण अवलंबताना दिसतात. पण मुंबईत असं एक हॉटेल आहे जिथून तुम्हला पिझ्झा घेण्यासाठी अवघा ६ मिनिटांचा कालावधी लागतो. कारण या हॉटेलमध्ये चक्क पिझ्झा वेंन्डिग मशिन ठेवण्यात आलंय. तुम्हाला हवं त्या पद्धतीचा पिझ्झा तुम्हाला इथं मिळू शकतो. 

खाद्यविषयक बातम्यांसाठी येथे क्लिक करा.

आणखी वाचा - मागताक्षणी पाणीपुरी, पाणीपुरी खाण्याच्या आनंदात खंड पडू नये म्हणून शोधलं पाणीपुरीचं व्हेण्डिंग मशीन!

खरंतर पिझ्झा वेंडिंग मशीन इटालियन देशातच आढळून येतात. भारतात अद्यापही या मशिनची सुरुवात झाली नव्हती. पण येस पिझ्झा या हॉटेलने भारतातलं पहिलं पिझ्झा वेंडिंग मशीनला सुरुवात केली आहे. या मशिनमध्ये सुरुवातीला तुम्हाला एक टोकन टाकावं लागणार आहे. टोकन टाकल्यानंतर समोर पर्याय येतात. त्या पर्यायांमध्ये तुम्हाला हवं असलेला पर्याय निवडायचा आणि ६ मिनिटं वाट पाहायची. अगदी सहाव्या मिनिटातच तुमच्यासमोर पिझ्झा आलेला असेल.  इथं तुम्हाला ४ प्रकारचे पिझ्झा, २ प्रकारचे पॉपकॉर्न आणि ज्यूसचे तीन प्रकार मिळतील. या मशिनमधून केवळ पिझ्झाच येतो असं नाही, तर तुम्हाला अवघ्या २ मिनिटात पॉपकॉर्नही मिळतील.

टॅग्स :Mumbaiमुंबईfoodअन्न