उन्हाळ्यात रोज लिंबू सरबत पिणं योग्य की अयोग्य? पाहा कोणत्या २ चुकांमुळे होऊ शकतं नुकसान....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 13:51 IST2026-05-07T13:50:17+5:302026-05-07T13:51:05+5:30

Lemon Water Drinking Tips : उन्हाळ्यात लिंबू सरबत रोज पिणं फायदेशीर असतं, पण ते पिण्याची योग्य पद्धत माहीत असली पाहिजे. आता ती पद्धत काय आहे हे जाणून घेऊया किंवा लिंबू सरबत पिताना काय काळजी घ्यावी हे पाहुयात.

Drinking lemon water every day benefits side effects | उन्हाळ्यात रोज लिंबू सरबत पिणं योग्य की अयोग्य? पाहा कोणत्या २ चुकांमुळे होऊ शकतं नुकसान....

उन्हाळ्यात रोज लिंबू सरबत पिणं योग्य की अयोग्य? पाहा कोणत्या २ चुकांमुळे होऊ शकतं नुकसान....

Lemon Water Drinking Tips : उन्हाचा पारा वाढला की, लोकांना सतत काहीतरी थंड पिण्याची किंवा खाण्याची इच्छा होत राहते. बाहेर कुठेही गेलात आणि पाहिलं तर असं दिसतं की, जास्तीत जास्त लोक घराबाहेर पडल्यावर ऊसाचा रस किंवा लिंबू सरबत पितात. बरेच लोक असेही असतात जे उन्हापासून बचावासाठी किंवा शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी लिंबू सरबत पितात. पण या दिवसांमध्ये रोज लिंबू सरबत पिणं आरोग्याच्या दृष्टीने खरंच फायदेशीर असतं का? हा प्रश्न फार महत्वाचा ठरतो. अशात एक्सपर्ट सांगतात की, उन्हाळ्यात लिंबू सरबत रोज पिणं फायदेशीर असतं, पण ते पिण्याची योग्य पद्धत माहीत असली पाहिजे. आता ती पद्धत काय आहे हे जाणून घेऊया किंवा लिंबू सरबत पिताना काय काळजी घ्यावी हे पाहुयात.

लिंबू सरबत शरीरासाठी किती फायदेशीर? 

उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक मिनरल्स कमी होतात. लिंबू सरबताने या गोष्टींची कमतरता लगे भरून निघते. शरीर हायड्रेट राहतं आणि आतून थंड राहतं. इतकंच नाही तर लिंबामध्ये व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. अशात आपल्याला दिवसभर ऊर्जा मिळते आणि फ्रेश वाटतं. लिंबू सरबत प्यायल्याने आपलं पोट हलकं राहतं. जर आपल्याला अपचन, गॅस किंवा पोटात जडपणा जाणवत असेल तर याने आराम मिळतो. लिंबू सरबताचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे याने शरीरातील विषारी तत्व बाहेर पडण्यास मदत मिळते. ज्यामुळे अनेक आजारांचा धोकाही कमी होतो.  

हेल्दी लिंबू सरबत कसं बनवाल?

लिंबू सरबत करायचं म्हटलं तर जास्तीत जास्त लोक यात भरपूर साखर घालतात. पण यात जास्त साखर घालण्याऐवजी थोडं मीठ घाला किंवा थोडं मध घाला. मीठ आणि मधाने सरबताची टेस्ट तर वाढतेच, सोबतच घामामुळे शरीरातून निघून गेलेले इलेक्ट्रोलाइट्सही परत मिळतात. नेहमी लक्षात ठेवा की, लिंबू सरबतात जास्त साखर घातल्याने त्याचे फायदे कमी होतात. 

काय काळजी घ्याल? 

- लिंबाच्या रसामध्ये भरपूर अ‍ॅसिड असतं. त्यामुळे लिंबू सरबत फार जास्त प्रमाणात प्याल तर याने दातांच्या वरचा थर डॅमेज होऊ शकतो.

- आपल्याला जर नेहमीच अ‍ॅसिडिटी किंवा पोटात जळजळ होण्याचा त्रास असेल, तर लिंबू सरबत कमी प्रमाणात प्यावं. जास्त प्याल तर त्रास आणखी वाढू शकतो.

उन्हाळ्यात रोज लिंबू सरबत पिणं फायदेशीर आहेच. पण त्यात साखरेचं प्रमाण कमी ठेवा आणि कमी प्रमाणातच प्या. जेणेकरून नुकसानऐवजी त्यातून अनेक फायदे मिळवता येतील.

Web Title : गर्मी में रोज नींबू पानी पीना सही है? इन गलतियों से बचें!

Web Summary : नींबू पानी गर्मी में फायदेमंद है, शरीर को हाइड्रेट रखता है और विटामिन सी से रोग प्रतिरोधक क्षमता बढ़ाता है। चीनी कम डालें, नमक/शहद मिलाएं और दांतों की समस्या और एसिडिटी से बचने के लिए सीमित मात्रा में सेवन करें। अधिकतम स्वास्थ्य लाभ के लिए समझदारी से पिएं।

Web Title : Is daily lemon water good in summer? Avoid these mistakes!

Web Summary : Lemon water is beneficial in summer, hydrating the body and boosting immunity with Vitamin C. Limit sugar, add salt/honey, and consume in moderation to avoid dental issues and acidity. Drink wisely for maximum health benefits.