सेल्फी काढण्याचे वेध सध्या सर्वांनाच लागले आहे. त्यातून हिंदी मराठी सेलिब्रिटीदेखील सुटल्या नाहीत. एका सेलिब्रिटीला सेल्फी काढण्याचे एवढे वेध लागले आहे की, तिची ओळख ‘सेल्फी क्वीन’ म्हणून ओळख झाली आहे. कोण आहे ती अभिनेत्री ? चला तर मग जाणून घेऊ तिच्या बाबत....आणि का म्हणतात तिला ‘सेल्फी क्वीन’..
‘एक दुजे के वास्ते’ या मालिकेच्या सेटवर अभिनेत्री निकिता दत्ताची ओळख ‘सेल्फी क्वीन’ म्हणून झाली आहे. कारणही तसेच आहे. ही बया दोन सीन्सच्या मध्येच जाऊन तिचे सेल्फी काढू लागते. बरं, तिची सेल्फी स्टिकही चक्क ६ फुट ३ इंच उंचीची आहे बरं का! आश्चर्य वाटलं ना? तर निकिताची ही आगळी वेगळी सेल्फी स्टिक म्हणजे तिचा सहकलाकार नमिक पॉल होय. ‘सध्या सेल्फिज हा आजच्या जमान्यातील आॅटोग्राफ झाला आहे, त्यामुळे सेटवर किंवा इतरत्र ही मी माझ्या खास सेल्फी स्टिकचाच वापर करते’ असे ती गमतीने म्हणते. आता तर निकितामुळे बाकीचे सगळेच सेल्फी काढण्यासाठी नमिकलाच सोबत घेऊन जाऊ लागलेत म्हणे.
ओळखा पाहू कोण आहे ही सेल्फी क्विन......
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 20:49 IST