शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

विजय मल्ल्यासाठी वेगळे निकष का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 07:38 IST

मल्ल्या 9000 कोटी बुडवून देशाबाहेर कसा काय गेला, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. 

‘किंग आॅफ गुड टाईम्स’ ही उपाधी मिळविलेले उद्योगपती विजय मल्ल्या सध्या अडचणीत सापडले आहेत. बँकांचे हजारो कोटी रुपए थकवून विजय मल्ल्या परदेशात निघून गेल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मल्ल्या 9000 कोटी बुडवून देशाबाहेर कसा काय गेला, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

मल्ल्या यशस्वीपणे देशाबाहेर जाण्यासाठी सरकारच जबाबदार असून हाती न सापडायला विजय मल्ल्या म्हणजे सुई नव्हे, असा खोचक टोलाही विरोधी पक्ष सरकारला लगावत आहेत. सरकारने त्यांना वेळीच अटक का केली नाही, त्यांचा पासपोर्ट जप्त का केला नाही, बँकांनी त्यांना इतके कर्ज डोळे बंद करून कसे दिले, हे पैसे बँक कसे वसूल करणार आहे, हा खरा प्रश्न आहे.

केवळ 10 हजारांच्या नोकरीसाठी दारोदार फिरणारी तरुणाई देशाचे कोटयवधी रुपए बुडवून मद्यसम्राटाचे हे पलायन उघडया डोळयांनी बघत आहे. याच विषयावर सीएनएक्सने तरुणाईचा कौल घेतला. तेव्हा त्यांनी अत्यंत कठोर प्रतिक्रिया  दिल्या. विजय मल्ल्याकडून संपूर्ण रक्क्म वसूल करावी. बँकाचे उद्योजकासाठी वेगळे निकष का? असा सवालही या युवकांनी केला. 

विशेष म्हणजे, प्रर्वतन संचलनालयाने सीबीआयने तयार केलेल्या आरोपपत्राच्या आधारावर चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. देशातील प्रमुख बॅँकांनी त्यांना देशाबाहेर जाण्यास मज्जाव करावा अशी विनंती सरकारक डे केली आहे.

मात्र ही विनंती करण्यापूर्वी विजय मल्ल्या देशाबाहेर पडले होते. आता या विषयावर गल्लीपासून दिल्लीपर्यंत रणकंदन होत आहे. दुसरीकडे मल्ल्यांनी मी देश सोडून गेलो नाही. मी आंतराष्ट्रीय उद्योगपती असून राज्यसभेचा सदस्य आहे. परदेशात कामानिमित्त आलो असल्याचे सांगून आपला बचाव केला आहे.