​मराठी सेलिब्रिटी क्रिेकेटचे युद्ध आजपासून सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2016 19:41 IST2016-05-04T14:11:27+5:302016-05-04T19:41:27+5:30

मराठी सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट लीगचे युद्ध आजपासून कोल्हापूरात सुरू होत असून यंदाचा MBCL चा तिसरा सीझन आहे.

The war of Marathi celebrity khatak continues from today | ​मराठी सेलिब्रिटी क्रिेकेटचे युद्ध आजपासून सुरू

​मराठी सेलिब्रिटी क्रिेकेटचे युद्ध आजपासून सुरू

ाठी सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट लीगचे युद्ध आजपासून कोल्हापूरात सुरू होत असून यंदाचा MBCL चा तिसरा सीझन आहे. प्रत्येक टीम एकमेकांसोबत दोन हात करायला सज्ज झाल्या आहेत. डॅशिंग मुंबई, ठाणे शिलेदार, रत्नागिरी टायगर्स, क्लासिक नाशिक, फटाका औरंगाबाद, शूर कोल्हापूर, अजिंक्यातारा सातारा, मस्त पुणे, कोहीनुर नागपुर अशा नऊ टीम गेल्या वर्षी मराठी बॉक्स क्रिके ट लीगमध्ये होत्या. यंदा दहाव्या टीमचा ह्या लीगमध्ये समावेश झाला आहे. नवी मुंबईचा धडाकेबाज नवी मुंबई हा नवा संघ सहभागी झाला आहे. 

नेहमी एकमेकांसोबत यारीदोस्ती निभवणारे लाडके सेलिब्रिटींमध्ये या क्रिकेट सामन्यांमध्ये घमाशान युद्ध रंगणार आहे. रत्नागिरी टायगर्सच्या सिद्धार्थ जाधव विरूद्ध क्लासिक नाशिकचा चिन्मय उदगिरकर ह्यांच्यात पहिली मॅच तर डॅशिंग मुंबईचा सुयश टिळक विरुद्ध मस्त पुणेचा शशांक केतकर यांच्यात दुसरी असे जबरदस्त सामने रंगणार आहेत. 

Web Title: The war of Marathi celebrity khatak continues from today