लग्नाचे टेलिकास्ट नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 21:32 IST2016-04-26T16:02:28+5:302016-04-26T21:32:28+5:30

टीव्ही स्टार रॉब कर्दशिया मॉडेल ब्लॅक चीनासोबत लग्नाची तयारी करीत आहे. मात्र दोघांच्या लग्नाचे टेलिकास्ट एकाही चॅनेलवर केले जाणार नाही. 

There is no telecast of marriage | लग्नाचे टेलिकास्ट नको

लग्नाचे टेलिकास्ट नको

व्ही स्टार रॉब कर्दशिया मॉडेल ब्लॅक चीनासोबत लग्नाची तयारी करीत आहे. मात्र दोघांच्या लग्नाचे टेलिकास्ट एकाही चॅनेलवर केले जाणार नाही. रॉबने याच महिन्याच्या सुरुवातीला चीनासोबत लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला होता. टीव्ही शो कीपिंग ‘अप विद कर्दशियन्स’मध्ये त्याच्या परिवाराचे काही क्लिपिंग दाखविण्यात आले होते. मात्र रॉबने विवाहाचे प्रेक्षपण करण्यास नकार दिला आहे. कारण त्याला त्याचा विवाह सार्वजनिक करायचा नसल्याचे त्याने यापूर्वीच स्पष्ट केले होते. रॉबने सांगितले की, मी टिव्हीवर काहीही दाखविणार नाही. मी केवळ आनंदी राहण्याचा प्रयत्न करीत आहे. संगळेच आनंदात आहेत. चीनाला जनवरी महिन्यात सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्याच्या कारणावरून टेक्सासच्या आॅस्टिनमध्ये पोलिसांनी अटक केली होती. तेव्हा रॉब एक हजार मैलापेक्षा अधिक दूर गाडी घेवून तिला घेण्यासाठी गेला होता. रॉबने याचाही खुलासा केला की, त्याचे लायसन्स जप्त केल्यामुळे तो गाडी चालवू शकत नाही.

Web Title: There is no telecast of marriage