​शिवानी चमकणार हिंदी मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 19:35 IST2016-04-26T14:05:19+5:302016-04-26T19:35:19+5:30

मराठी कलाकारांचा भाव सध्या भलताच वाढला आहे. हिंदी कलाकारांच्या तोडीस तोड आपले मराठमोळे कलाकार आहेत. भार्गवी चिरमुले, अनुजा साठेनंतर आता आणखी एका अभिनेत्रीचं हिंदीत पदार्पण होत आहे.

Shivani shines in Hindi series | ​शिवानी चमकणार हिंदी मालिकेत

​शिवानी चमकणार हिंदी मालिकेत

ाठी कलाकारांचा भाव सध्या भलताच वाढला आहे. हिंदी कलाकारांच्या तोडीस तोड आपले मराठमोळे कलाकार आहेत. भार्गवी चिरमुले, अनुजा साठेनंतर आता आणखी एका अभिनेत्रीचं हिंदीत पदार्पण होत आहे. स्टार प्रवाहवरील देवयानी मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री शिवानी सुर्वे लवकरच हिंदीच्या छोट्या पडद्यावर झळकतेय. बºयाच कालावधीपासून शिवानीने ब्रेक घेतला होता. आता ती हिंदी पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. 

स्टार प्लस वाहिनीवरील ‘जाना ना दिल से दूर’ ह्या नव्या कोºया मालिकेत शिवानी ‘विविधाना’ या नायिकेच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. ही नवी मालिका मे २०१६ पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Web Title: Shivani shines in Hindi series