रशियन वैज्ञानिकाने शोधले 'अमर' होण्याचे औषध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 02:24 IST2016-01-16T01:20:01+5:302016-02-12T02:24:19+5:30

चिरकाला जिवंत राहण्यासाठी अनादी काळापासून मानवाची धडपड चालू आहे. आता तर रशियाच्या एका वैज्ञानिकाने दावा केला आहे की त्याने अमर होण्याचे रहस्य उलगडले आहे.

Russian scientists discovered 'immortal' drug! | रशियन वैज्ञानिकाने शोधले 'अमर' होण्याचे औषध!

रशियन वैज्ञानिकाने शोधले 'अमर' होण्याचे औषध!


/> अँटोली ब्राऊश्‍चकोव असे त्याचे नाव असून अमर होण्यासाठी त्याने ३५ लाख वर्षे जूने बॅक्टेरिआ इंजेक्शनद्वारे स्वत:च्या शरीरात रोपण केले. मॉस्को राज्याच्या 'जिओक्रायोलॉजी'विभागचे प्रमुख ब्राऊश्‍चकोव यांनी 'बॅकीलूस एफ' नावाचा बॅक्टेरिआ शोधला आहे जो लाखो वर्षांपासून बर्फात जिवंत आहेत. यावरून त्यांनी निष्कर्ष काढला की हे बॅक्टेरिआ आपल्याला अमर बनवू शकतात. उंदीर, किडे आणि रक्तपेशीवर करण्यात आलेल्या या बॅक्टेरिआच्या प्रयोगावरून तरी सकारत्मक परिणाम दिसून आले आहेत. मात्र यामागचे शास्त्रीय कारण समजू शकले नाही.

Web Title: Russian scientists discovered 'immortal' drug!