पोएसीला सोशल मीडियाचा तिरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 16:16 IST2016-03-22T23:16:03+5:302016-03-22T16:16:03+5:30

हॅरी पॉटर चित्रपटातील अभिनेत्री क्लीमेंस पोएसीचे म्हणणे आहे की, सोशल मीडियाचा ती प्रचंड तिरस्कार करते. तिच्या मते इंस्टाग्राम आणि ट्विटरसारख्या सोशल साइट्स प्रचंड आत्मकेंद्रीत असून, यांचा समाजावर नकारात्मक प्रभाव पडत आहे.

Poetic Hate Social Media | पोएसीला सोशल मीडियाचा तिरस्कार

पोएसीला सोशल मीडियाचा तिरस्कार

री पॉटर चित्रपटातील अभिनेत्री क्लीमेंस पोएसीचे म्हणणे आहे की, सोशल मीडियाचा ती प्रचंड तिरस्कार करते. तिच्या मते इंस्टाग्राम आणि ट्विटरसारख्या सोशल साइट्स प्रचंड आत्मकेंद्रीत असून, यांचा समाजावर नकारात्मक प्रभाव पडत आहे. तसेच सेल्फीज हा प्रकार जीवावर उठणारा आहे. मला या मीडियाचा अजिबात वापर करायचा नाही, मात्र माझ्या नावे एक फेक अकाऊंट तयार केल्याने लोकांना वाटते की मी सोशल मीडियावर सक्रीय आहे. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. पुढे बोलताना पोएसी म्हणाली की, मी केवळ पुस्तकांचे कव्हर पेज, चित्रपटांचे पोस्टर आणि बºयाचदा संगीताशी संबंधित कनेण्ट शेअर करीत असते. कारण या माध्यमाचा कधीही चांगला वापर केला जावूच शकत नाही. लोकांना नकारात्मकतेकडे वळविण्याचा या माध्यमावर जोरदार प्रयत्न सुरू असल्याचेही तिने सांगितले.

Web Title: Poetic Hate Social Media