शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
3
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
4
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
5
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
6
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
7
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
8
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
9
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
10
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
11
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
12
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
13
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
14
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
15
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
16
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
17
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
18
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
19
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
20
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
Daily Top 2Weekly Top 5

नाईट आऊट विथ शार्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 17:16 IST

तीन भाग्यवान विजेत्यांना या मत्सालयात (अ‍ॅक्वेरिअम) असणाऱ्या 35 शार्कस्च्या मधोमध राहण्याची आणि झोपण्याची संधी मिळणार आहे.

शार्क म्हटले की स्टीव्हन स्पीलबर्गचा ‘जॉज्’ चित्रपट आठवतो. समुद्रातील सर्वात भयंकर शिकारी म्हणून शार्क बदनाम आहे. मग अशा डेडली शार्क आजुबाजूला फिरत असताना तुम्हाला झोपायला सांगितले तर? आहे हिंमत? हो? तर मग तुमच्यासाठी ही बातमी आहे.

‘एअर बीनबी’ नावाच्या कंपनीने अ‍ॅडव्हेंचर ट्रीप करू पाहणाऱ्या लोकांसाठी एका खास स्पर्धा सुरू केली आहे. पॅरिसच्या ‘अ‍ॅक्वेरिअम दी पॅरिस’सोबत मिळून ‘एअर बीनबी’ स्पर्धेतून निवडलेल्या तीन भाग्यवान विजेत्यांना या मत्सालयात (अ‍ॅक्वेरिअम) असणाऱ्या 35 शार्कस्च्या मधोमध राहण्याची आणि झोपण्याची संधी मिळणार आहे.

त्यासाठी शॉर्क टँकमध्ये 30 फुट अंडरवॉटर एका खास काचेचे बेडरुम तयार करण्यात आले आहे. चोही बाजूने पारदर्शक या बेडरुममधून तुम्ही शार्कचे आयुष्य अगदी जवळून पाहू शकता. तसेच समुद्र जीवशास्त्रज्ञ आणि शार्क तज्ञ फ्रेड ब्युएलेकडून या शिकारी माशाबद्दल सखोल माहितीेदेखील मिळणार आहे.

लोकांमध्ये असणाऱ्या शार्कबद्दल अनेक गैरसमजुतींना दुर करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केल्याचे ‘एअर बीएनबी’ सांगितले.



ही कंपनी अशा प्रकारे एकदम हटके आणि भिन्न अ‍ॅडव्हेंचर हॉलिडे प्लॅन करण्यासाठी प्रसिद्ध आहे. सदूर पर्वतांवर मंगोलियातील यर्ट (झोपडी, डच विंडमिल, पॅरिसमधील धार्मिक भुयारी मार्गांची सफर किंवा जंगलातील ट्री-हाऊस असे अनेक साहसी पर्याय कंपनी उपलब्ध करून देते. परंतु ही ‘शार्क नाईट आऊट’ आतापर्यंतची सर्वात अनोखी आॅफर आहे असेच म्हणावे लागेल.