​‘नाईके’ ठरला सर्वात मौल्यवान फॅशन ब्रँड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 14:10 IST2016-05-15T08:40:42+5:302016-05-15T14:10:42+5:30

‘फोर्ब्स’ने जगातील सर्वात मुल्यवान ब्रँड्सची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये नाईके 18 क्रमांकासही फॅशन क्षेत्रात अव्वल ठरला आहे.

The most valuable fashion brand was 'Nike' | ​‘नाईके’ ठरला सर्वात मौल्यवान फॅशन ब्रँड

​‘नाईके’ ठरला सर्वात मौल्यवान फॅशन ब्रँड

शन म्हणजे स्वत:च्या व्यक्तीमत्त्वाला अधिक चांगल्याप्रकारे सादर करण्याची गोष्ट आहे. अल्ट्रा लक्झरी ब्रँड ‘लुई वितोन्’ आतापर्यंत फॅशन क्षेत्रातील सर्वात मुल्यवान ब्रँड म्हणून ओळखला जायचा.

त्यांच्या साध्या एका बेल्टची किंमत तीस हजार रुपयांपर्यंत असते. मात्र यंदा नाईकेने लुई वितोन्ला सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून मागे पाडले आहे.

‘फोर्ब्स’ने जगातील सर्वात मुल्यवान ब्रँड्सची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये नाईके  18 क्रमांकासही फॅशन क्षेत्रात अव्वल ठरला आहे. लुई वितोन्ला 19 क्रमांक मिळाला.

नाईकेची व्हॅल्यू 27.5 बिलियन डॉलर्स तर महसुल 30 बिलियन डॉलर्स एवढा आहे. त्या तुलनेत लुई वितोन् थोडासा मागे पडला. त्यांची व्हॅल्यू 27.3 मिलियन डॉलर्स तर महसुल 10 बिलियन डॉलर्स एवढा होता.

गेल्यावर्षीच्या तुलनेत लुई वितोन्ची फार मोठी घसरण झाली आहे. मागच्या वर्षी या यादीमध्ये लुई वितोन् दहाव्य क्रमांकावर होत तर नाईक अठराव्या क्रमांकावर.

विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय  बाजारपेठेत टक्का वाढेलेला असतानाही ‘आदिदास’ 90 व्या क्रमांकावर आहे. 15.3 बिलियन डॉलर्स महसुल असुनही कंपनीच्या क्रमवारीत सुधारणा झाली नाही.

Web Title: The most valuable fashion brand was 'Nike'