लगातार सहावर्षांपासून आफ्रिकेत गेंड्यांची शिकार होण्याचे प्रमाण वाढत आहे. २००८मध्ये बंदी घातल्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात गेंड्यांची शिकार झाली आहे.
शिंगातील वैद्यकीय गुणवैशिष्ट्यांमुळे चीन आणि व्हिएतनाम येथून त्यांची मागणी वाढत असल्यामुळे शिकारीच्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती ‘आययूसीएन’ने दिली.
गेंड्यांचे शिंग आपल्या नखांप्रमाणे ‘केरॅटिन’पासून बनलेले असते. कॅन्सर आणि इतर आजारांवर उपचार म्हणून शिंगापासून तयार करण्यात आलेल्या पावडरची मोठ्या प्रमाणत विक्री होते.
शिंगाची तस्करी रोखण्यासाठी १९७७ मध्ये ‘सीआयटीईएस’ने बंदी घातली होती. मात्र, आफ्रिकेत २००८मध्ये ती लागू झाली. जगातील सुमारे ८० टक्के गेंडे (वीस हजार) आफ्रिकेत राहतात.