बॉलिवूडसेलिब्रिटीमधील रणवीर सिंह आपले आउटफिट्स आणि लूक्समुळे नेहमीच चर्चेत असतात. कधी त्याचे विचित्र लूक तर कधीत्याचे शूज... रणवीरचं सर्व काही हटके. यामुळेच तो सर्व फॅन्समध्ये नेहमीच चर्चेत असतो. पण फक्त रणवीर सिंगच नाही तर रणबीर कपूरकडेही अॅनिमल फ्रिंट शूज असल्याचे पाहायला मिळतं. आज आम्ही तुम्हाला रणबीर कपूरचे काही लेटेस्ट फोटो दाखवणार आहोत. 

रणबीर कपूरने एका फुटबॉल मॅचदरम्यान हे शूज वेअर केले होते. रणबीरचे हे शूज काही वेळातच इंटरनेटवर व्हायरल झाले होते. जाणून घेऊया शूजची किंमत आणि त्याबाबत सर्वकाही... 

रणबीर कपूरच्या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये त्याने वेअर केलेले अॅनिमल फ्रिंटचे शूज हे नाइकी या स्पोर्ट्स ब्रॅडचे आहेत. या शूजवर वाघ, बिबट्या आणि जेब्रा फ्रिंट आहेत. प्रिमीयम लेदरपासून तयार करण्यात आलेले हे शूज पायांसाठी फार आरामदायी आहेत. याव्यतिरिक्त काळ्या, पांढऱ्या, लाल आणि हिरव्या लेस अशा चार सेट्ससोबत हे येतात. तसेच शूजच्या वर असणाऱ्या ब्लॅक लूकमुळे ते आणखी हटके दिसतात. 

रणबीर कपूरने काही दिवसांपूर्वी हे शूज वेअर केले होते आणि अनेक चाहत्यांच्या नजरा रणबीरच्या या शूजवरच खिळल्या होत्या. आता आपण या शूजची किंमत जाणून घेऊया, नाइकीच्या या अ‍ॅनिमल फ्रिंट शूजची किंमत 250 यूएस डॉलर म्हणजेच, 17826 रुपये आहे. 

आतापर्यंत आपल्याला वाटत होतं की फक्त रणवीर सिंहच अ‍ॅनिमल फ्रिंटसाठी क्रेझी आहे. पण बॉलिवूडमधील सक्सेफुल स्टार किड्सपैकी एक असलेला रणबीर कपूरही अॅनिमल फ्रिंटसाठी क्रेझी असल्याचं दिसून आलं. दरम्यान, रणबीर आलिया भट्टसोबतच्या अफेअरमुळे नेहमीच चर्चेत असतो. 

Web Title: Know price of ranbir kapoor animal print shoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.