तुम्हाला माहित झाल्यास आश्चर्य वाटेल, दिग्दर्शक जॉन फेवराऊ, सुपरव्हाइजर रॉब लेगेटो आणि द जंगल बुकच्या टीमने सिनेमाचे संपूर्ण शूटिंग लॉस एंजिलिसच्या एका चार भिंतीच्या स्टुडिओमध्ये केले. टीमने नील सेठीच्या जवळ केवळ क्र ोमा मदतीने संपूर्ण जग वसवले. ८०० कम्प्युटर आर्टिस्टच्या टीमने जवळपास एक वर्षांत नील सेठीच्या अवतीभोवती ५० प्रजातीचे प्राणी, जंगल, झरे, झाडे-झुडपे, पाणी, आग आणि पृथ्वीची निर्मिती केली.
लंडनची एमपीसी (द मूविंग पिक्चर कंपनी) कंपनी सुरु वातीपासून सिनेमाशी निगडीत होती. सिनेमाच्या संपूर्ण शूटिंगदरम्यान लंडनहून लॉस एंजिलिसला आलेल्या टीमने प्रत्येक फ्रेमवर काम केले. एमपीसीने बल्लू, मोगलीची फॅमिली, बघीरा, शेर खानसह प्रत्येक पात्राला व्हीएफएक्सच्या माध्यमातून बनवले.