शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मितभाषी लोकांनी असा सुरू करावा संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 14:33 IST

मितभाषी लोकांनी असा सुरू करावा संवादमितभाषी लोकांचा स्वभाव हा लाजरा आणि शांत असतो.

मितभाषी लोकांनी असा सुरू करावा संवादमितभाषी लोकांचा स्वभाव हा लाजरा आणि शांत असतो. दुसर्‍यांशी बोलणे त्यांना खूप अवघड वाटते. परंतु आजच्या युगात कामासंबंधी अनोळखी लोकांशी बोलण्याची वारंवार गरज पडते. अशावेळी मितभाषीपणा तुमच्या करिअरला मारक ठरू शकतो. लोकांशी संभाषण करणे जर तुम्हाला कठिण काम वाटत असेल तर पुढील चार टीप्सचा नक्कीच वापर करा.१. न्युनगंड बाळगू नकातुम्ही जर आधीच मनाशी पक्के केले की आपल्याला बोलताच येणार नाही तर तुम्ही कधीच बोलू शकणार नाही. त्यामुळे सर्वात आधी असा नकारात्मक विचार काढून टाका. अनोळखी व्यक्तीला जाणून घेण्याची, त्याचे विचार समजून घेण्याची ही फार चांगली संधी असते. त्यामुळे स्वत:हून अनोळखी लोकांशी बोला. संभाषणात आघाडी घेणारे लोक नेहमीच दुसर्‍यांना इम्प्रेस करतात.२. इंटरेस्ट दाखवासमोरची व्यक्ती काय बोलतोय याकडे नीट लक्ष द्या. त्याने विचारलेल्या प्रश्नांना मनापासून उत्तरे द्या. तुम्ही जर प्रामाणिकपणे संभाषणात रस घेतला तर समोरचादेखील तेवढय़ाच उत्सुकतेने बोलतो. अनोळखी लोकांशी बोलणे तसे पाहिले तर फार अवघड गोष्ट नाही. तुम्ही जर मनापासून ठरवले तर संभाषण आपोआप सुरू होते. त्यासाठी गरज आहे ती उत्सुकता दाखवण्याची.३. प्रश्न विचाराकमी बोलणार्‍या लोकांची खरी अडचण म्हणजे समोरच्या व्यक्तीशी बोलण्यास कशी सुरुवात करावी, त्याला भेटल्यावर पहिल्यांदा काय म्हणावे, ही असते. यावर बेस्ट ऑप्शन म्हणजे त्याला प्रश्न विचारा. यामुळे तुम्हाला कमी बोलावे लागेल. दुसर्‍या व्यक्तीला संभाषणाच्या केंद्रस्थानी ठेवल्याने तोदेखील तुमच्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तरे देईल. अशाच पद्धतीने हळूहळू बोलणे वाढत असते.४. एका शब्दात उत्तर देऊ नकासमोरच्या व्यक्तीला जास्त प्रश्नसुद्धा नका विचारू. थोडे तुमच्याबद्दलही त्याला सांगा. त्याने विचारलेल्या प्रश्नांना एका शब्दात उत्तर देऊ नका. त्यामुळे संभाषण पुढे सकरण्यास अडचण येते. व्यक्तीचा स्वभाव, वेळ, स्थळ पाहून बोलाण्याचा प्रयत्न करा. समोरची व्यक्ती काय करते हे जाणल्यानंतर त्यासंबंधी बोलणे अधिक सोयस्कर असते.