शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

सॅलरी निगोशिएशनसाठी महत्त्वाच्या टीप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 04:12 IST

सॅलरी निगोशिएशनसाठी महत्त्वाच्या टीप्सएकाच कंपनीत काम करून कित्येक वर्षे झाली परंतु अजुनही मनासारखी पगारवाढ होत नाही असे खूप लोक असतात. कंपनी कधीतरी आपला प्रामाणिकपणा आणि लॉयल्टीपाहून पगारवाढ करेल या भ्रामक आशेवर ते दिवस काढत असतात. मुळात पगारवाढ कशी मागावी हेच त्यांना कळत नाही.

एकाच कंपनीत काम करून कित्येक वर्षे झाली परंतु अजुनही मनासारखी पगारवाढ होत नाही असे खूप लोक असतात. कंपनी कधीतरी आपला प्रामाणिकपणा आणि लॉयल्टीपाहून पगारवाढ करेल या भ्रामक आशेवर ते दिवस काढत असतात. मुळात पगारवाढ कशी मागावी हेच त्यांना कळत नाही. सॅलरी निगोशिएशन ही कला असते आणि एखाद्या स्पोर्ट एजंटपेक्षा ही कला कोण जास्त चांगली शिकवू शकते? प्रसिद्ध स्पोर्ट एजंट एड वाझिएलेविस्की यांनी पगारवाढ कशी मागावी यासाठी ५ महत्त्वपूर्ण टीप्स दिल्या आहेत.१. स्वत:ची व्हॅल्यू जाणून घ्यातुम्ही करत असलेल्या कामाचा योग्य मोबादला किती यासाठी थोडा होमवर्क करा. परंतु असे करत असताना प्रॅक्टिकल असणे गरजेचे असते. बर्‍याच लोकांना असे वाटते, की आहे त्यापेक्षा दुप्पट पगार त्यांना मिळायला पाहिजे. अशा प्रकारे पगारवाढ मागण्याची चूक कधीही करू नका.२. पाठपुरावा कराएकदा का तुम्ही होमवर्क करून योग्य आकडा ठरवला तर वाटाघाटी करत असताना त्याचा पाठपुरावा करा. अपेक्षित पगार मिळवण्यास तुम्ही कसे सक्षम आहात हे पटवून द्या. मात्र जिद्दीला पेटू नका. निगोशिएनमध्ये अप आणि डाऊन येतच असतात.३. इतरांशी तुलना करू नकाऑफिसमध्ये त्याला इतका पगार तर मला का नाही, असे अनेक जणांना वाटत असते. सहकार्‍याला मिळाला तितका पगार तुम्हाला मिळेलच असे नाही. अशी तुलना तुम्हाला अनप्रोफेशनल ठरवू शकते. त्यामुळे पगारवाढीची शक्यता आहे त्यापेक्षाही कमी होऊन जाते.४. पगार म्हणजे केवळ पैसा नाहीबर्‍याच लोकांचा असा गैरसमज असतो, की पैसे वाढून मिळणे म्हणजे पगारवाढ. समजा तुम्हाला ३ लाखांच्या पॅकेजची अपेक्षा आहे. मात्र कंपनी तयार नसेल तुम्ही २.७ लाख पगार आणि वाढीव मेडिकल इंश्योरन्स मागू शकता. पगारवाढीचा हा स्मार्ट मार्ग आहे.५. दुसरा पर्याय तयार ठेवातुमची मेहनत, काम, ओव्हर टाईम सगळे सांगून झाल्यावरही पगार वाढत नसेल तर दुसर्‍या नोकरीचा शोध सुरू करा. कोणत्याच कंपनीला अनुभवी आणि कार्यक्षम कर्मचारी सोडून जाणे फायद्याचे नसते. पण असे करताना उतावळेपणा करू नये.