शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
3
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
4
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
5
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
6
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
7
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
8
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
9
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
10
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
11
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
12
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
13
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
14
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
15
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
16
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
17
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
18
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
19
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
20
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श व्यक्तींचाच असावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 08:01 IST

 बायोपिक तयार करण्यामागे त्या व्यक्तीने केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात येतो

मागील एका शतकापासून जगभरातील लोकांचे मनोरंजन करीत असतानाच अनेक गंभीर विषय चित्रपटांनी हाताळले. अनेक महान व्यक्तींचा जीवन प्रवास चित्रपटांद्वारे पडद्यावर उलगडला गेला. अशा चित्रपटांना ‘बायोपिक’ म्हणून ओळखले जाते.

भाग मिल्खा भाग, मेरी कोम, मांझी, नीरजा या चित्रपटांनी चांगली प्रशंसा मिळविली. विशेष म्हणजे, या चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवरही खूप कमाई केली. यावर्षीही अनेक बायोपिक प्रदर्शित होणार आहेत. संजय दत्तची जेलमधून सुटका झाली अन् त्याच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्यात येणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

या दरम्यान अनिल कपूरने माझा बायोपिक कोण पाहणार असा प्रश्न करून बायोपिकच्या निर्मितीवर प्रश्नचिन्ह उभे केले. अशा स्थितीत तरुणाईला बायोपिक आवडतात का, व त्यांना कु णाचा बायोपिक पाहणे आवडेल याबाबची माहिती सीएनएक्सने जाणून घेतली. यावेळी बायोपिक हा आदर्श व्यक्त ींचाच असावा असे मत शहरातील तरुणाईने व्यक्त केले. बायोपिक तयार करण्यामागे त्या व्यक्तीने केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात येतो. शिवाय त्या व्यक्तीच्या जीवनातील छुपा पैलू समोर आणण्याचे प्रयत्न यातून केले जातात.

महात्मा गांधी यांच्या जीवनावर तयार करण्यात आलेला रिचर्ड अ‍ॅडनबेरो दिग्दर्शित ‘गांधी’ हा चित्रपट उत्कृष्ट बायोपिक मानला जातो. या चित्रपटात बेन किंग्सले यांनी महात्मा गांधीची भूमिका साकारली होती. मनीरत्नम यांचा गुरू हा चित्रपट उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्या जीवनपटाशी साम्य दर्शविणारा असला तरी तो केवळ चित्रपट आहे असे मनीरत्नम यांनी सांगितले आहे.

काही वर्षांपूवी आलेल्या आधी या चित्रपटाची कथा इंदिरा गांधी यांच्या जीवनाशी साम्य दर्शविणारी असल्याने त्यावर बंदी घालण्यात आली होती हे विशेष.

यावर्षी क्रिकेटर मोहमंद अझरुद्दीन याच्या जीवनावर ‘अझहर’ व महेंद्र सिंग धोनीवरील ‘धोनी’, पाकने दहशतवादी ठरविलेला पंजाबचा शेतकरी सबरजीत सिंग याच्यावरील सबरजीत हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांची शहरातील तरुणाईलाही प्रतीक्षा आहे.