शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
3
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
4
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
5
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
6
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
7
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
8
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
10
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
11
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
12
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
13
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
14
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
15
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
16
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
17
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
18
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
19
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

​जगातील 80 टक्के लोकांसाठी ‘आकाशगंगा’ अदृश्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 16:08 IST

जागतिक लोकसंख्या सुमारे 83 टक्के लोकांना कृत्रिम प्रकाशाच्या प्रदूषणामुळे रात्रीचे नैसर्गिक आकाश दिसतच नाही.

अमेरिका आणि इटलीमधील संशोधकांनी हाय-रेझ्युलेशन सॅटेलाईटद्वारे जगाचा ‘प्रकाश नकाशा’ तयार केला. या नकाशानुसार जागतिक लोकसंख्या सुमारे 83 टक्के लोकांना कृत्रिम प्रकाशाच्या प्रदूषणामुळे रात्रीचे नैसर्गिक आकाश दिसतच नाही.

त्वरीत काही उपाययोजना हाती घेतल्या नाही तर ही परिस्थिती अधिक गंभीर होण्याचा त्यांनी इशारा दिला.


शाळेत असताना विज्ञानात शिकलो होतो की, रात्रीच्या काळ्याभोर आकाशात जी ‘दुधाची नदी वाहताना’ दिसते ती म्हणजे आपली आकाशगंगा. इंग्रजीमध्ये यालाच ‘मिल्कीवे’ म्हणतात.

आकाशगंगेच्या सौंदर्याने भुरळून शतकानुशतके  कित्येक कथा, चित्र, गीतं, कविता रचल्या गेल्या. लहानपणी गावात बाहेर अंगणात किंवा गच्चीवर झोपताना चांदण्यांच्या मंद प्रकाशात सारं आभाळ उजळून गेल्याचे आठवते का?

पण आता निसर्गाचे तेच सौंदर्य पाहणे जगातील एक तृतांश लोकांना दुरापस्त झाले आहे. थॉमस एडिसनेने शोध लावलेल्या प्रकाशदिव्यामुळे अंधारातून जग बाहेर आले मात्र आता हेच कृत्रिम दिवे आपल्या आकाशगंगेला झकोळून टाकताहेत.

मागच्या पाच दशकांमध्ये उ. अमेरिका आणि युरोपमध्ये प्रकाश प्रदूषणात दरवर्षी सहा टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती संशोधकाच्या टीमने दिली. पंधरा वर्षांपूर्वीदेखील याच टीमने अशा प्रकारचा प्रकाश नकाशा तयार केला होता.

सर्वाधिक प्रकाश प्रदूषण सिंगापूरमध्ये नोंदविण्यात आले तर त्यानंतर कुवैत, कतार यांचा क्रमांक येतो. आफ्रिका खंडातील चाड, मादागास्कार हे देश यादीमध्ये सर्वात शेवटी आहे. विशेष म्हणजे अमेरिका आणि युरोपमधील 99 टक्के लोकांना प्रकाश प्रदूषणामुळे आकाशगंगा दिसत नाही.

प्रकाश प्रदूषण ही गंभीर समस्या असून याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत संशोधक व्यक्त करत आहेत. रात्रीच्यावेळी तीव्र स्वरुपाचा कृत्रिम प्रकाश पक्ष्यांच्या स्थलांतरचक्राला बिघडवू शकतो, निशाचर प्राण्यांचा दिनक्रम बदलू शकतो तसेच पाण्याखालील जीवसृष्टीवरदेखील याचे अनिष्ट परिणाम दिसू शकतात. मानवाच्या झोपेवरदेखील परिणाम होऊन अनेक आरोग्यविषय समस्या उद्भवण्या धोका आहे. यामुळे कॅन्सरचादेखील धोका आहे.


Credt : Light Pollution Science and Technology Institute

‘प्रकाश नकाशा’चे सहनिर्माते आणि ‘लाईट पॉल्यूशन सायन्स अँड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट’चे संशोधक फॅबिओ फॅलची यांनी सांगितले की, केवळ दिवे बंद करून प्रकाश प्रदूषण टाळता येणार नाही. त्यामुळे केवळ तीव्रता कमी होईल पण जी हानी आधीच झाली आहे ती कशी भरून काढणार?