​दोन वर्षांत प्रथमच विदेशी पर्वतवीर एव्हरेस्टवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 14:19 IST2016-05-15T08:49:57+5:302016-05-15T14:19:57+5:30

दोन ब्रिटिश व एक मेक्सिकन गिर्यारोहकांचे यश दैदिप्यमान आहे.

For the first time in two years, Mount Everest, the exotic mountain range | ​दोन वर्षांत प्रथमच विदेशी पर्वतवीर एव्हरेस्टवर

​दोन वर्षांत प्रथमच विदेशी पर्वतवीर एव्हरेस्टवर

हसवीरांचे स्वर्ग म्हणजे माऊंट एव्हरेस्ट. एकदा का एव्हरेस्ट शिखरावर चढाई केली म्हणजे स्वर्ग गाठल्यासारखेच आहे.

जगातील सर्वात उंच एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी दरवर्षी जगभरातील गिर्यारोहक नेपाळमध्ये दाखल होतात. परंतु गेली दोन वर्षे कोणत्याच विदेशी गिर्यारोहकाला शिखर गाठण्यात यश मिळाले नाही.

म्हणून तर दोन ब्रिटिश व एक मेक्सिकन गिर्यारोहकांचे यश दैदिप्यमान आहे. केंटन कूल व रॉबर्ट रिसर्ड लूकास (ब्रिटिश) आणि डेव्हिड लायनो गोंझालेज (मेक्सिको) अशी त्यांची नावे आहे. 

नेपाल माऊंटेनरिंग असोसिएशनच्या अँग त्शेरिंग यांनी माहिती दिली की, गुरुवारी सकाळी तीन नेपाळी मार्गदर्शकांच्या साहाय्याने या तीन विदेशी गिर्यारोहकांनी 8850 मी. शिखर सर केले असून ते लोवर कॅम्पकडे निघाले आहेत. 

विदेशी गिर्यारोहकांना शिखरापर्यंत मदत करण्यासाठी नऊ नेपाळी मार्गदर्शकांनी बुधवारीच सर्व ‘रोप्स’ फिक्स केल्या होत्या. गेल्यावर्षी भूकंपामुळे एव्हरेस्ट मोहिम रद्द करण्यात आली होती. 2014 साली आलेल्या हिमावसरणामुळे 16 शेरपांना प्राण गमवावा लागला होता.

Web Title: For the first time in two years, Mount Everest, the exotic mountain range