शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
2
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा
3
चार कागदपत्रे नसतील तर महाराष्ट्रात राहता येणार नाही; व्हायरल पोस्टनंतर सरकारने सांगितलं सत्य 
4
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
5
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
6
ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?
7
'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
8
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
9
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
10
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
11
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
12
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
13
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
14
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
15
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
16
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
17
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
18
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
19
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
20
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
Daily Top 2Weekly Top 5

​फेसबुकचे सगळ्यांना ‘याड लागलं’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2016 21:03 IST

फेसबुक यूजर्स दिवसातील सरासरी 50 मिनिटे एफबीवर असतात.

सोशल मीडियाचा अनभिषक्त सम्राट ‘फेसबुक’ने आपल्या सर्वांचेच आयुष्य व्यापून टाकलेले आहे. फेसबुकवर नसणे म्हणजे जणू मागासलेपणाचे लक्षण बनले.

म्हणूनच अनेक जण फेसबुकवर असतातच. याचा फायदाही दिसायला लागला आहे. कंपनीच्या पहिल्या तिमाहीतील नफा तिपटीने वाढून दीड हजार मिलियन डॉलर्स एवढा झाला आहे. तसेच मासिक सक्रिय यूजर्सचा आकडा 165 कोटींवर गेला आहे.

फेसबुकची क्रेझ मात्र या आकड्यांवरून नाही दिसत. ती कळते 50 मिनिटांवरून! होय, फेसबुक यूजर्स दिवसातील सरासरी 50 मिनिटे एफबीवर असतात. आता हा आकडा तुम्हाला लहान वाटत असेल तर थांबा.

कारण ‘ब्युरो आॅफ लेबर स्टॅटिक्स’नुसार 24 तासांपैकी आपण सरासरी 8.8 तास तर झोपण्यात, 2.8 तास टीव्ही/फिल्म पाहण्यात आणि खाण्या-पिण्यासाठी 1.07 तास खर्ची घालतो. म्हणजे आपण जेवण्या इतका वेळ फेसबुकला देतो.

‘एव्हरकोर’चे विश्लेषक केन सेन सांगतात की, 50 मिनिटे हा खूप मोठा काळ आहे. फेसबुकची एकूण यूजर संख्या वाढली म्हटल्यावर सरासरी अ‍ॅक्टिव्ह टाईम घटायला हवा. मात्र, फेसबुकचे लोकांना इतके व्यसन लागलेले आहे की, दिवसातील अधिकाधिक काळ फेसबुकवर आॅनलाईन राहण्यात ते धन्यता मानतात.

2014 साली एफबी यूजर दिवसातून सरासरी 40 मिनिटे सक्रीय असत. यूजरबेस वाढूनही सरासरी वेळेमध्ये वृद्धी झाली आहे. बरं हे झाले केवळ सरासरीबद्दल. कित्येक लोक असे आहेत जे तासन्तास फेसबुकवर पडीक असतात. तुम्हीदेखील त्यांपैकी असाल तर तुम्हाला स्वत:ला विचारण्याची गरज आहे की, मला इंटरनेट अ‍ॅडिक्शन डिसआॅर्डर तर नाही ना झाला?