शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

अनुभवा श्रीलंकेमधील पर्यटनाचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2016 17:38 IST

दक्षिण भारताच्या टोकाशी असलेल्या श्रीलंकेत पर्यटनाचा आनंद म्हणजे प्रवास, निवांतपणा, वन्यजीवन, वारसा आणि संस्कृतीचा अनुभव. या देशात गेल्यानंतर कोणत्या पाच प्रमुख गोष्टी कराल याविषयी माहिती देत आहोत.

दक्षिण भारताच्या टोकाशी असलेल्या श्रीलंकेत पर्यटनाचा आनंद म्हणजे प्रवास, निवांतपणा, वन्यजीवन, वारसा आणि संस्कृतीचा अनुभव. या देशात गेल्यानंतर कोणत्या पाच प्रमुख गोष्टी कराल याविषयी माहिती देत आहोत.उत्तरपूर्व किनाऱ्यावरील त्रिणकोमाली येथे तुम्हाला अत्यंत मनोहारी सागरदृष्ये पाहावयास मिळतील. स्रॉर्कलिंग करताना रंगीबेरंगी समुद्री जीवनाची अनुभुती घेता येईल. व्हेल माशांना पाहण्याची संधीही तुम्हाला प्राप्त होईल. निळ्या रंगाचे व्हेल आणि स्पर्म व्हेल मासे पाहण्यासाठी मार्च ते एप्रिल हा कालावधी उत्तम आहे. इतर महिन्यांमध्ये तुम्हाला १०० हून अधिक डॉल्फिन पोहताना आणि त्यांच्या पाण्यातील हालचाली पाहताना दिसून येतील.तुम्ही जर इतिहास आणि संस्कृतीचे प्रेमी असाल तर तुम्ही श्रीलंकेच्या प्रेमात पडाल. कोलंबोपासून अगदी जवळच्या अंतरावर कँडी शहरात तुम्हाला पाली दंताचे मंदिर दिसेल. अगदी पूर्वेला अनुराधापुरा आणि डाम्बुला ही शहरे आहेत. सिजीरिया रॉक फोर्टेसजवळच आहे. प्रत्येक स्थळ स्वत:चे वेगळे स्थान राखून आहे. इतिहास, संस्कृती आणि धार्मिक बाबतीत स्थानांचे महत्त्व आहे. हनुमानाची पाऊले असणारी बरीच स्थळे श्रीलंकेत आहेत.मध्य श्रीलंका आणि कोलंबो यांच्यादरम्यान पिन्नावाला हत्ती केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. आशियाई हत्तींची पैदास या ठिकाणी होते. या ठिकाणी सकाळी छोट्या हत्तींना भरविले जाते आणि दुपारी मोठ्या प्रमाणात त्यांना बाटल्यांच्या सहाय्याने भरविण्यात येते. छोटे हत्ती पाण्यात खेळताना तुम्हाला पाहता येईल.हिक्काडुवा ते हंबोटा या दाक्षिणात्य किनारी तुम्ही सूर्यस्रान, पोहणे, स्कुबा डायव्हिंग आणि सामुद्रिक आनंदाचा उपभोग घेऊ शकता. गॅले, वेलिंग्मा, टँजेली या बिचवर तुमच्या पर्यटनाचा आनंद द्विगुणित होईल.याला नॅशनल पार्कमध्ये सफारी करताना तुम्हाला रोमांचक अनुभव येतील. विशेषत: जगातील सर्वात अधिक चित्यांची संख्या असलेल्या या ठिकाणी तुम्हाला अगदी सहजरित्या चित्ते फिरताना दिसतील.  मोहक पक्षी, हत्ती आणि इतर वन्यजीव या पार्कमध्ये तुम्हाला दिसू शकतील. अस्वल, लांडगे आणि ठिपके असणारे हरणांची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे.विमानसेवा: जेट एअरवेज, श्रीलंकन एअरलाईन्स यांची मुंबईहून कोलंबोसाठी थेट विमानसेवा आहे. निवास: सिनामोेन हॉटेल्स आणि रिसॉर्टस् यांची विविध ११ ठिकाणी राहण्याची सोय आहे. बजेट ट्रॅव्हलर्ससाठी घरगुती आणि एअरबीएनबीची सोय आहे