‘स्टँडर्ड टेक्स्टाईल’ कंपनीशी यासंदर्भात करार करण्यात आलेला असून त्यानुसर शंभर टक्के कॉटन फायबरचे दरवर्षी २६ लाख बाथरूम टॉवेल्स आणि ४९ लाख हात पुसण्याचे टॉवेल्सचा पुरवठा करण्यात येणार आहे.
मॅरिएट हाटेल्समध्ये यापूर्वी जॉर्डनमध्ये टेरी कापडापासून तयार झालेले टॉवेल वापरत असत.
‘आमच्या या निर्णयामुळे १५० जणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. स्वदेशी व्यावसायाला चालना मिळण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे,’ असे मॅरिएट हॉटेलच्या चेयरमन बोर्डाचे अध्यक्ष बिल मॅरिएट म्हणाले.
स्टँडर्ड टेक्सटाईलने ११० अतिरिक्त कर्मचाऱ्यांना नोकरीवर घेतले असून लवकरच आणखी ४० जणांना कामावर घेतले जाणार आहे. तसेच दरवर्षी विदेशातून टॉवेलची आयात करताना जहाजांच्या तीनशे फेऱ्यांतून होणाऱ्या हरितगृह वायू उत्सर्जनालादेखील आळा बसेल.
अमेरिकेत चालू असलेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुक प्रचारामध्ये स्वदेशी उत्पादनावर भर देऊन ‘मेड इन अमेरिका’द्वारे नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रमुख मुद्दा आहे. त्याधर्तीवर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे इतर कंपन्यादेखील पुढाकार घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.