चिन्मयने लग्नानंतर साजरा केला पहिला गुढीपाडवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2016 23:12 IST2016-04-10T06:12:45+5:302016-04-09T23:12:45+5:30

लग्नानंतर पहिल्या सणांचं विशेष कौतुक असतं.

Chinmay celebrated after the first Gudi Padava | चिन्मयने लग्नानंतर साजरा केला पहिला गुढीपाडवा

चिन्मयने लग्नानंतर साजरा केला पहिला गुढीपाडवा

्नानंतर पहिल्या सणांचं विशेष कौतुक असतं. अभिनेता चिन्मय उद्गीकर आणि अभिनेत्री गिरीजा जोशीचं डिसेंबरमध्ये लग्न झालय. हा त्यांचा पहिला गुढीपाडवा आहे. त्यामुळे अर्थातच तो विशेष असणार आहे. गिरीजा पहिल्या गुढीपाडव्याला घरीच असली तरीही चिन्मय मात्र कामात आहे.
 
चिन्मय उद्गीकर सांगतो, ‘सध्या डेली सोप आणि नवीन नाटक दोन्हीमध्ये व्यस्त असल्याने पहिल्या गुढीपाडव्याला घरी बसणं शक्य नाही. बरं नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरी बसण्यपेक्षा काम केललं चांगलं. त्यामुळे घरी बसणार नाही. पण गिरीजा मात्र गुढीपाडवा छान सेलिबे्रट करणार आहे. 

नवीन वर्षाला काहीतरी नवीन घेण्याची प्रथा आहे. त्यामुळे नवीन काय घेतलं, असं विचारल्यावर गिरीजा म्हणते, ‘चिन्मयने मला नवीन आयफोन दिलाय. याशिवाय सोनं खरेदी करण्याचा विचार चालला होता. पण आता असलेला फ्रिज थोडा खराब झालाय. तर नवीन फ्रिज खरेदी करण्याचा विचार आहे. 

Web Title: Chinmay celebrated after the first Gudi Padava