शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

​​कर्करोगावर मात करणारे सेलिब्रिटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 08:30 IST

 कॅन्सर हा केवळ शब्द ऐकूनही अंगावर काटा उभा राहतो. परंतु प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर या आजाराशी संघर्ष करणारे, त्यातून सुखरूप बाहेर येणारेही अनेक आहेत.

काल-परवाच जगभरात कॅन्सर डे पाळण्यात आला. कॅन्सर हा केवळ शब्द ऐकूनही अंगावर काटा उभा राहतो. परंतु प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर या आजाराशी संघर्ष करणारे, त्यातून सुखरूप बाहेर येणारेही अनेक आहेत. आपल्याला आवडणारी विविध क्षेत्रातील अशी काही मंडळी आहेत ज्यांनी ही करामत करून दाखवली आहे. अशाच काही सेलिब्रिटींची ही साहसकथा...मनीषा कोईराला सर्वकाही छान सुरू असताना एकेदिवशी मनीषाच्या आयुष्यात आक्रित घडले. तिला अंडाशयाचा कर्करोग असल्याचे उघड झाले. ती उपचारासाठी अमेरिकेस गेली. अत्यंत संघर्ष केल्यानंतर तिने कर्करोगावर मात केली. जेव्हा ती परत आली, तेव्हा तिच्या चेहºयावर हास्य होते. कर्करोग तुमच्या शरीराला इजा करू शकतो. परंतु, तुमच्या जिद्दीला नाही, हाच संदेश ती आजही देत असते.युवराज सिंग भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू युवराजला सेमिनोमा (फुफ्फुस आणि हृदय यांच्यादरम्यान झालेली गाठ) झाल्याचे आढळून आल्यानंतर सारे क्रिकेटविश्व हादरले. युवराज उपचारासाठी अमेरिकेला गेला. त्या ठिकाणाहून त्याने फेसबुकवर अपडेट करीत आपल्या फॅन्सना दिलासा दिला. तो परतला तो विजयी होऊनच. त्याने यावर पुस्तकही लिहिलेय, ‘द टेस्ट आॅफ माय लाईफ’लिसा रे कर्करोगाशी लढा दिल्यानंतर आॅक्टोबर २०१५ मध्ये लिसा रे हिने आपण कॅन्सरसोबत लढत असल्याचे मान्य केले. ‘मला रक्ताचा कर्करोग झाला आहे, हा आजार बरा होण्यासारखा नाही आणि मी अशाही स्थितीत लढते आहे, असे तिने सांगितले. तिच्या जगण्याच्या जिद्दीला नक्कीच सलाम करण्यासारखे आहे.अनुराग बासू लाईफ इन मेट्रो आणि बर्फी अशा उत्तम चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा अनुराग बासू हा रक्ताच्या कर्करोगाशी झगडतोय, हे किती लोकांना माहिती आहे? डॉक्टरांनी त्याला केवळ २ महिने जगशील असे सांगितले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत त्याने ‘लाईफ इन मेट्रो’ आणि ‘गँगस्टर’ची स्क्रीप्ट लिहून काढली. तो अजूनही काम करतोय याचे कारण त्याचे जीवनावरील प्रेम आहे.हग जॅकमन २०१३ साली हग जॅकमॅनच्या नाकाच्या पेशींमध्ये त्वचेचा कर्करोग आढळून आला. त्यानंतर त्याने अनेक उपचार घेतले. प्रत्येक तीन महिन्याला तो वैद्यकीय तपासणीसाठी जात असतो. स्वत:ची काळजी घेण्याबरोबरच त्याने त्वचेच्या कर्करोगाबाबत सार्वजनिक काळजी घेण्यासाठी चळवळही सुरू केली आहे.