​मेलिसा इथरीजच्या मुलांचा पिता ब्रॅड पिट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 15:01 IST2016-03-30T22:00:16+5:302016-03-30T15:01:09+5:30

एका अफवेनुसार तिच्या मुलांचा पिता दुसरा तिसरा कोणी नसून हॉलिवूड सुपरस्टार ब्रॅड पिट आहे.

Brad Pitt, father of Melissa Jones' children? | ​मेलिसा इथरीजच्या मुलांचा पिता ब्रॅड पिट?

​मेलिसा इथरीजच्या मुलांचा पिता ब्रॅड पिट?

रसिद्ध गायिका मेलिसा इथरीजच्या मुलांचा  बायोलॉजिकल पिता कोण याविषयी नव्वदच्या दशकपांसून विविध शक्यता वर्तविल्या जातात. अशाच एका अफवेनुसार तिच्या मुलांचा पिता दुसरा तिसरा कोणी नसून हॉलिवूड सुपरस्टार ब्रॅड पिट आहे.

परंतु एवढ्या वर्षांनंतर अखेर मेलिसाने याबाबत खुलासा केला आहे की, तिच्या मुलांचा पिता ब्रॅडपिट नसून क्रॉस्बी, स्टिल्स अँड नॅश बँडमधील संगीतकार डेव्हिड क्रॉस्बी आहे.

आॅस्ट्रेलियाच्या ‘स्टुडियो 10’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, मी आणि माझी पार्टनर जुली साफरने मुलं होण्यासाठी ब्रॅडची मदत घेण्याचा विचार केला होता. मात्र, डेव्डिड क्रॉस्बीने वीर्यदान केले होते.

यावर मेलिसाचे मुले काहीशी नाराज झाल्याचे दिसतात. तिने सांगितले की, मुलांना जेव्हा हे कळाले तेव्हा ते म्हणाले की, ब्रॅड जर आमचे वडील असते तर कदाचित आम्ही दिसायला अधिक सुंदर झालो असतो. 

ब्रॅड आणि मेलिसा खूप चांगले मित्र आहे. मैत्रीखातर ब्रॅड वीर्यदान करण्यासही तयार होता. मात्र, मेलिसाने त्याला नकार दिला.

Web Title: Brad Pitt, father of Melissa Jones' children?