शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वक्तृत्वकलेबद्दलच्या ५ गैरसमजुती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:56 IST

शेकडो लोकांसमोर एकट्याने स्टेजवर उभा राहून भाषण देणे खूप लोकांना फार अवघड गोष्ट वाटते. मात्र काही वक...

शेकडो लोकांसमोर एकट्याने स्टेजवर उभा राहून भाषण देणे खूप लोकांना फार अवघड गोष्ट वाटते. मात्र काही वक्ते असे असतात जे हजारोंच्या गर्दीलाही आपल्या ओजस्वी वाणीने जिंकून घेतात. असे वक्ते इतके छान भाषण कसे काय देऊ शकतात, याचे अनेकांना आश्‍चर्य वाटते. जेव्हा यासंबंधी अभ्यास करण्यात आला तेव्हा अनेक रंजक बाबी समोर आल्या. या रंजक बाबींसोबतच भाषणाबद्दलच्या काही गैरसमजुतीबद्दलही माहिती मिळाली. कुठल्या आहेत या गैरसमजुती बघूयात..१. भाषण ही जन्मजात कला आहे : अनेक लोकांना असे वाटते की जे लोक चांगले भाषण करतात त्यांना जन्मजातच ही कला अवगत असते. मात्र हा फार मोठा गैरसमज आहे. सरावाने वक्तृत्वकला ही विकसित केली जाऊ शकते. आत्मविश्‍वासाच्या बळावर आपल्यातील न्युनगंड दूर केला तर कोणीही चांगले भाषण करू शकतो.२. उत्तम भाषणकर्ते घाबरत नाहीत : कितीही अनुभवी किंवा एक्सपर्ट स्पीकर असू द्या, भाषणाआधी त्याला थोडी भीती वाटत असते. भाषण कसे होईल याची त्यांनासुद्धा धाकधूक लागलेली असते. मात्र या भीतीला ते आत्मविश्‍वासाने ओव्हरकम करतात. उत्तम वक्तृत्वपटूची हीच तर खासियत असते.३. मितभाषी लोक कधीच स्पीकर नाही बनू शकत :भाषण केवळ जास्त बोलणार्‍यांनीच करावे असा नियम नाही. तुम्ही जरी कमी बोलत असाल तरीसुद्धा तुम्ही चांगले भाषण करू शकता. उलट शांत, विनम्र लोकच मुद्देसुद, विचारांची सुसूत्रपणे मांडणी करून उत्तम भाषण करतात. याचे उदाहरण म्हणजे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी.४. चांगले पाठांतर करूनच चांगले भाषण करता येते : घोकंपट्टी करून कोणतीच गोष्ट चांगली होत नाही. तर मग भाषण तरी कसे होणार? पाठ केलेल्या गोष्टी केवळ स्टेजवर टेप रेकॉर्डरवर रेकॉर्ड केल्यागत बोलायच्या नसतात. जागा, प्रसंग, प्रेक्षक आणि विषय पाहून भाषण करावे लागते.cnxoldfiles/em> प्रभावीपणे भाषण करण्यासाठी स्टेजवर एकदम ताठ उभे रहावे लागते हा सुद्धा लोकांना गैरसमज असतो. परंतु प्रामाणिक, मनापासून बोलणे हीच चांगल्या भाषणाची चिन्हे आहेत. तुम्ही कसे उभे राहता, उभे राहता की बसून भाषण करता यापेक्षा तुम्ही काय बोलता हे जास्त महत्त्वाचे असते.