स्टायलिश आणि स्मार्ट लूकसाठी कपड्यांच्या रंगाचं सिलेक्शन फार महत्वाचं, पाहा १० बेस्ट कलर कॉम्बिनेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 12:59 IST2026-04-23T12:56:48+5:302026-04-23T12:59:12+5:30

Color combinations for men : चारचौघात आपण वेगळे आणि उठून दिसावे असं सगळ्यांनाच वाटत असतं. चला तर मग, पुरुषांसाठी काही उत्तम कलर कॉम्बिनेशन पाहूयात.

10 best Color combinations for men to look dashing and handsome | स्टायलिश आणि स्मार्ट लूकसाठी कपड्यांच्या रंगाचं सिलेक्शन फार महत्वाचं, पाहा १० बेस्ट कलर कॉम्बिनेशन

स्टायलिश आणि स्मार्ट लूकसाठी कपड्यांच्या रंगाचं सिलेक्शन फार महत्वाचं, पाहा १० बेस्ट कलर कॉम्बिनेशन

Color combinations for men :  गुड लुकिंग दिसण्यासाठी कपड्यांचे रंग आणि त्यांचे योग्य कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचे असते. योग्य रंग तुमच्या व्यक्तिमत्त्वाला चार चाँद लावतात. सोबतच आपला आत्मविश्वासही वाढवतात. रंगांचा आपल्या मनावरही परिणाम होतो, त्यामुळे योग्य निवड केल्यास तुमचा प्रभाव अधिक मजबूत होऊ शकतो. चारचौघात आपण वेगळे आणि उठून दिसावे असं सगळ्यांनाच वाटत असतं. चला तर मग, पुरुषांसाठी काही उत्तम कलर कॉम्बिनेशन पाहूयात.

ब्लॅक आणि व्हाईट

ब्लॅक आणि व्हाईट हे क्लासिक आणि कायम ट्रेंडमध्ये असलेलं कॉम्बिनेशन आहे. हे साधं पण खूप प्रभावी लुक देतं. ब्लॅक शर्टसोबत व्हाईट पॅन्ट किंवा व्हाईट शर्टसोबत ब्लॅक जीन्स हा उत्तम पर्याय आहे. हा लुक प्रोफेशनल आणि एलिगंट वाटतो.

नेव्ही ब्लू आणि ग्रे

हे कॉम्बिनेशन सॉफ्ट पण आकर्षक लुक देतं. ऑफिस, पार्टी किंवा कॅज्युअल सगळीकडे फिट बसतं. नेव्ही ब्लू टॉपसोबत ग्रे पॅन्ट्स खूप शार्प दिसतात.

ऑलिव्ह ग्रीन आणि बेज

हे कॉम्बिनेशन नैसर्गिक आणि आरामदायक लुक देतं. आउटडोअर किंवा कॅज्युअल वेअर साठी परफेक्ट आहे. ऑलिव्ह ग्रीन शर्टसोबत बेज पॅन्ट्स खूप छान दिसतात.

बर्गंडी आणि ब्लॅक

हे गडद आणि आकर्षक कॉम्बिनेशन आहे, खासकरून हिवाळ्यात खूप स्टायलिश दिसतं. बर्गंडी स्वेटरसोबत ब्लॅक जीन्स एक दमदार लुक देतात.

लाईट ब्लू आणि व्हाईट

हे कॉम्बिनेशन फ्रेश आणि कूल लुक देतं. उन्हाळ्यात खास करून छान दिसतं. लाईट ब्लू शर्टसोबत व्हाईट पॅन्ट्स एक क्लीन आणि सॉफ्ट लुक देतात.

स्मोक्ड ग्रे आणि ब्लॅक

हे कॉम्बिनेशन आधुनिक आणि प्रोफेशनल लुक देतं. स्मोक्ड ग्रे जॅकेटसोबत ब्लॅक जीन्स खूप स्टायलिश दिसतात.

टॅन आणि व्हाईट

हे कॉम्बिनेशन सॉफ्ट आणि उबदार लुक देतं. दिवसा किंवा हलक्या उन्हात घालण्यासाठी उत्तम आहे.

कूल ग्रीन आणि व्हाईट

हे कॉम्बिनेशन शांत आणि फ्रेश लुक देतं. कॅज्युअल वेअर साठी परफेक्ट आहे.

ग्रे आणि ब्लॅक

हे कॉम्बिनेशन खूप प्रोफेशनल आणि शार्प दिसतं. ऑफिस वेअर साठी उत्तम पर्याय आहे.
 

Web Title : स्टाइलिश पुरुष: स्मार्ट लुक के लिए कपड़ों के 10 बेहतरीन रंग संयोजन

Web Summary : आकर्षक दिखने वाले पुरुष सही रंग चुनते हैं। ब्लैक एंड व्हाइट, नेवी और ग्रे, ऑलिव ग्रीन और बेज क्लासिक, शार्प और नेचुरल लुक देते हैं। बरगंडी और ब्लैक, लाइट ब्लू और व्हाइट, स्मोक्ड ग्रे और ब्लैक स्टाइलिश प्रभाव डालते हैं।

Web Title : Stylish Men: 10 Best Clothing Color Combinations for a Smart Look

Web Summary : Good-looking men choose the right colors. Black and white, navy and grey, olive green and beige offer classic, sharp, and natural looks. Burgundy and black, light blue and white, smoked grey and black create stylish impressions.