शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

ग्लोबल वॉर्मिंगपासून परतीचे दोर कापले गेलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 06:10 IST

ओझोन थरांची चाळणी रोखण्यासाठी तातडीने प्रयत्न हवेत

- श्रीमंत माने/निशांत वानखेडेनागपूर : जगभरातील प्रत्येकाला धडकी भरविणाऱ्या इंटरगव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) अहवालाने जग जागे झाले व कार्बन डाय ऑक्साइडसह अन्य हरितवायूंचे उत्सर्जन थांबविण्यासाठी तातडीने पावले उचलली तरी पृथ्वीचे वाढलेले तापमान कमी होईल का? तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की परतीचे दोर कापले गेले आहेत. पुढची ३० वर्षे तापमान वाढतच जाईल. सूर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करणाऱ्या ओझोन थराची चाळणी रोखण्याच्या प्रयत्नात २०५० मध्ये हरितवायूंचे उत्सर्जन शून्यावर आले तरी २१०० पर्यंत फारतर दोन दशांश अंश इतकीच घट तापमानात होईल.  अतिउष्णतेच्या लाटा, अतिवृष्टी, समुद्रांच्या पातळीत धोकादायक वाढ, दीर्घकाळाचे दुष्काळ हे ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम आता वारंवार दिसू लागले आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात  अमेरिका व कॅनडा हे देश अतिउष्णतेच्या लाटांनी होरपळून निघाले. भारत, चीन, जर्मनीत महापुरांनी थैमान घातले. सायबेरिया, तुर्की, ग्रीसमध्ये जंगलाला भयंकर वणवा लागला. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात हिमालयामध्ये भूस्खलन, ढगफुटीच्या घटना वाढल्या आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आयपीसीसी अहवालात हवामानबदल किंवा तापमानवाढीचे जे परिणाम नोंदविले गेले आहेत, ते हेच आहेत आणि  भविष्यकाळात या घटना कमी होण्याची शक्यता नाही.  (समाप्त)...तर दोन दशांशांचा दिलासा २०१५ चा पॅरिस करार गंभीरपणे घेण्यात आला नाही. आता कडक पावले उचलली तर २०५० पर्यंत पृथ्वीच्या तापमानात १.६ अंश सेल्सीअस इतकी वाढ होईल. एकविसाव्या शतकाच्या मध्यावर हरितवायूंचे उत्सर्जन शून्यावर आणले तर ही वाढ रोखता येईल. कार्बन जाळायला, भूगर्भातील इंधन काढायला सुरवात झाली त्या औद्योगिक क्रांतीच्या आधीच्या टप्प्यावर कधीच पोचता येणार नाही.पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आतापर्यंत येथील जीवसृष्टी पाच वेळा नष्ट झाली आहे. यापैकी डायनाेसार नामशेष हाेण्याचे उदाहरण सर्वांना परिचित आहे. हे सुंदर जग वाचविण्यासाठी शेवटच्याच पिढीला प्रयत्न करावे लागतील. अन्यथा विनाश कुणीच राेखू शकणार नाही.  - भगवान केसभट, वातावरण फाउंडेशन, मुंबई