शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

कोटीतीर्थमध्ये आणखी एका कासवाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 10:51 IST

environment Muncipalty Kolhapur- कोटीतीर्थ तलावमध्ये गुरुवारी आणखी एका कासवाचा मृत्यू झाला. वनविभागाच्या पथकाने मृत कासव मंगळवार पेठ येथील पशुवैद्यकीय विभागाकडे विच्छेदनासाठी दिली असून, त्याचा अहवाल आल्यानंतर नेमका कशामुळे कासवांचा मृत्यू होतो हे स्पष्ट होणार आहे.

ठळक मुद्देकोटीतीर्थमध्ये आणखी एका कासवाचा मृत्यूमासेमारीचा गळ कारणीभूत

कोल्हापूर : कोटीतीर्थ तलावमध्ये गुरुवारी आणखी एका कासवाचा मृत्यू झाला. वनविभागाच्या पथकाने मृत कासव मंगळवार पेठ येथील पशुवैद्यकीय विभागाकडे विच्छेदनासाठी दिली असून, त्याचा अहवाल आल्यानंतर नेमका कशामुळे कासवांचा मृत्यू होतो हे स्पष्ट होणार आहे.गेल्या काही दिवसांपासून कोटीतीर्थ तलावातील कासव मृत होण्याच्या घटना घडत आहेत. मागील महिन्यांत पाच ते सहा कासव मृत झाले होते. आठ दिवसांपूर्वीही असाच प्रकार घडला हातो. दोन दिवसांपूर्वीही एक कासव मृत झाले.

गुरुवारी आणखी एका कासवाचा मृत्यू झाला. आतापर्यंत दहा कासवांचा मृत्यू झाल्याने प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. तलावातील पाण्याचा रंग हिरवट झाला आहे. यामध्ये मैला व गटाराचे पाणी मिसळत असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या तलावातील जलचर प्राणी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.मासेमारीचा गळ कारणीभूतकोटीतीर्थमध्ये कासव मृत होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये मासेमारीचा गळ कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, वारंवार घटना घडत असल्यामुळे दूषित पाणीही याला कारणीभूत असण्याची दाट शक्यता आहे. यासाठी पाण्याचे नमुने तपासावे लागतील, अशी प्रतिक्रिया वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.दूषित पाणी शुद्ध होण्यासाठी प्रयत्नकोटीतीर्थ तलावातील पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी तसेच दूषित पाणी शुद्ध होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तसेच तलावात कचरा, सांडपाणी जाऊ नये याचे नियोजन करावे लागेल. यासाठी आगामी बजेटमध्ये नावीण्य पूर्ण योजनेतून कोटीतीर्थ तलावासाठी निधी राखून ठेवणे आवश्यक असल्याची माहिती महापालिकेच्या पर्यावरण विभागातून दिली आहे. 

टॅग्स :environmentपर्यावरणMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर